ETV Bharat / bharat

रामलल्ला गर्भगृहात होणार विराजमान : राम जन्मभूमीत तिसऱ्या दिवशी धार्मिक विधींचा उत्साह

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 7:05 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : राम जन्मभूमीत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी राम जन्मभूमीत विविध धार्मिक पूजा करण्यात येत आहेत.

Ram Mandir Pran Pratishtha
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची जय्यत तयारी

अयोध्या Ram Mandir Pran Pratishtha : राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा अभिषेक करण्यासाठी आता केवळ काही दिवस उरले आहेत. मंगळवारपासून सहा दिवस धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज राम मंदिरात विधीचा तिसरा दिवस आहे. आज रामलल्लाच्या मूर्तीला स्नान करण्यात येणार आहे. विविध विधीदेखील पार पडणार आहेत. हे विधी वाराणसीच्या वैदिक महंतांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहेत. 21 जानेवारी हा धार्मिक विधी करण्याचा शेवटचा दिवस आहे.

राम लल्ला गर्भगृहात होणार विराजमान : रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळ येत असल्यानं रामभक्तांना मोठा आनंद होत आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या धार्मिक विधीमुळे रामभक्तांमध्ये देशभरात उत्साह संचारला आहे. आज सायंकाळी तीर्थपूजा, जलयात्रा, जलाधिवास, गंधविवास, असा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. राम लल्लाच्या मूर्तीला आज पवित्र स्नान करण्यात येणार आहे. संध्याकाळी राम लल्लाच्या मूर्तीवर सुगंधित द्रवपदार्थ लावण्यात येणार आहेत. त्यानंतर शुभ मुहूर्तावर रामलल्ला मदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहे.

मंगळवारी करण्यात आली पूजा : मंगळवारी रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यात तपश्चर्या आणि कर्मकुटी पूजा करण्यात आली. रामजन्मभूमी संकुलात इतर धार्मिक विधी केले जात आहेत. वाराणसीचे वैदिक महंत ही पूजा करत आहेत. उद्या 19 जानेवारीला औषधीवास, केशराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास विधी होणार आहेत.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन राजकारण : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जवळ येत आहे. देशातील नागरिकांमध्ये राम मंदिर सोहळ्यावरुन मोठा उत्साह आहे. मात्र दुसरीकडं विरोधकांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन मोठं राजकारण सुरू केलं आहे. काँग्रेस, शिवसेनेसह देशभरातील विविध राजकीय पक्षांनी राम मंदिर सोहळ्याकडं पाठ फिरवली आहे.

हेही वाचा :

  1. मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात होऊ शकतो बदल, आता 'या' दिवशी जाणार अयोध्येला
  2. अयोध्येत प्रभू रामाचा लवकरच प्राणप्रतिष्ठापना सोहळा, आज होणार 'ही' विशेष पूजा
  3. राम मंदिराच्या इतिहासावर सुरू होणार अभ्यासक्रम, या विद्यापीठात शिकायला मिळणार रामजन्मभूमीचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.