ETV Bharat / bharat

अखेर प्रतीक्षा संपली; रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक आली पुढं, गर्भगृहात विराजमान - मूर्तीची पूजा

Ram Mandir 2024 : अयोध्येतील रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची तारीख जवळ येत असल्यानं रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता रालल्लाच्या मूर्तीची पहिली झलक पुढं आली आहे. गुरुवारी रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाली आहे.

Ram Mandir 2024
रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 3:13 PM IST

अयोध्या Ram Mandir 2024 : अयोध्येतील रामलल्ला मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. त्यापूर्वी रामलल्ला मूर्तीची पहिली झलक पुढं आली आहे. रामलल्लाची मूर्ती गडद रंगाची आहे. गुरुवारी रामलल्लाच्या मूर्तीची विधीपूर्वक मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक पुढं आली आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीचं पूजन आणि प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

  • Ayodhya, UP | Glimpse of the idol of Lord Ram inside the sanctum sanctorum of the Ram Temple in Ayodhya.

    (Source: Sharad Sharma, media in-charge of Vishwa Hindu Parishad) pic.twitter.com/kZ6VeuYvSt

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 18, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक आली पुढं : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं वितरित केलेल्या निमंत्रण पत्रिकेवर हे चित्र प्रकाशित करण्यात आलं आहे. याबाबतचं वृत्त ईटीव्ही भारतनं 16 जानेवारीला प्रकाशित केलं होतं. ही भगवान श्रीरामाची मूर्ती असून तिला गर्भगृहात स्थान देण्यात येणार असल्याचा दावा सूत्रांच्या माहितीवरुन करण्यात आला होता. तो दावा खरा ठरला आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या या मूर्तीची पूजा करुन प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. गुरुवारी रात्री उशिरा रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो समोर आला आहे.

शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली रामलल्लाची मूर्ती : अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणारी रामलल्लाची मूर्ती पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. रामलल्लाची ही मूर्ती मैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. रामलल्लाची ही मूर्ती गडद रंगाची असून रामलल्लाच्या हातात बाण आहे. रामलल्लाच्या या मूर्तीमध्ये भगवान विष्णूची कोमलता आणि बाल अवतारातील ही मूर्ती आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून रामलल्लाच्या मूर्तीचा एकही फोटो प्रसिद्ध करण्यात आला नाही. मात्र विश्व हिंदू परिषदेचे नेते शरद शर्मा यांचा हवाला देत वृत्तसंस्थेनं एक फोटो जारी केला होता. यामध्ये रामलल्लाची ही मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर रामलल्लाची ही मूर्ती पुढं आली आहे.

हेही वाचा :

  1. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारचा आदेश जारी
  2. रामलल्ला गर्भगृहात होणार विराजमान : राम जन्मभूमीत तिसऱ्या दिवशी धार्मिक विधींचा उत्साह
  3. सर्वत्र राम भक्तीची लाट; प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी कशी सुरू आहे तयारी? पाहा फोटोंमधून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.