ETV Bharat / bharat

राकेश टिकैत 13 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर - शेतकरी नेते राकेश टिकैत

दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या टिकैत यांचा हा महत्वाचा दौरा असणार आहे. दिल्लीतील आंदोलनासोबतच देशभरातील विविध राज्यांना भेटी देऊन तिथल्या नागरिकांना आंदोलनाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न आता शेतकरी नेत्यांकडून केला जात आहे.

राकेश टिकैत 13 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर

author img

By

Published : Mar 5, 2021, 10:03 AM IST

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत येत्या 13 मार्च रोजी पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांचा हा महत्वाचा दौरा समजला जात आहे.

टिकैत यांचा दौरा महत्वाचा

पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान राकेश टिकैत एका महापंचायतला संबोधित करणार आहेत. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या टिकैत यांचा हा महत्वाचा दौरा असणार आहे. दिल्लीतील आंदोलनासोबतच देशभरातील विविध राज्यांना भेटी देऊन तिथल्या नागरिकांना आंदोलनाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न आता शेतकरी नेत्यांकडून केला जात आहे. याच रणनितीचा भाग म्हणून टिकैत देशातील काही राज्यांचा दौरा करणार आहेत. त्यांचा पश्चिम बंगाल दौराही याच रणनितीचा एक भाग आहे.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत निवडणूक

पश्चिम बंगालमध्ये 27 मार्च पासून विधानसभा निवडणुकीला सुरूवात होणार आहे. एकूण आठ टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे.

हेही वाचा - शेतकरी आंदोलन लाठ्या आणि बंदुकीला घाबरून संपणार नाही - राकेश टिकैत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.