ETV Bharat / bharat

राष्ट्रपतीपदाच्या सर्वसंमतीच्या उमेदवारावर चर्चेसाठी राजनाथ सिंह यांच्याकडे भाजपची धुरा - राजनाथ सिंह न्यूज

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की विरोधी नेत्यांशी चांगले संबंध राष्ट्रपती निवडणुकीत उपयुक्त ठरतील. जेणेकरून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकमताने उमेदवार घोषित करता येईल. वाचा ETV भारतच्या वरिष्ठ प्रतिनिधी अनामिका रत्न यांचे विश्लेषण

राष्ट्रपतीपदाच्या सर्वसंमतीच्या उमेदवारावर राजनाथ सिंह यांची वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा

author img

By

Published : Jun 16, 2022, 11:44 AM IST

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 17 राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या विरोधी गटाने बुधवारी नवी दिल्लीत सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रपतीपदाचा उमेदवार उभा करण्यावर विचारमंथन केले. परंतु, भाजपचे राजनाथ सिंह विरोधी गटातील सदस्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करत असल्याने सहमतीच्या उमेदवाराला अद्यापही वाव असल्याचे दिसत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

सर्व संमतीचे भाजपचे प्रयत्न - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसंमतीने उमेदवार घोषित करता यावा यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्‍याने भीड चेपण्यात मदत होईल असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, राजनाथ सिंह यांनी आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. विरोधकांनी सर्वसहमतीच्या उमेदवाराकडे जाण्याऐवजी राष्ट्रपतीपदाची संयुक्त उमेदवारी जाहीर केल्याने काय परिणाम होईल.. हे आता येणारा काळच सांगेल परंतु, ममता बॅनर्जींसोबत कॉंग्रेस पक्ष समान पातळीवर नसल्याचे दिसत आहे. त्याऐवजी, काँग्रेसने पुढाकार घेतल्यास काही राजकीय पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) गोटात येतील, असा सर्वसाधारण समज होता.

प्रादेशिक पक्षांची महत्वाची भूमिका - दुसरीकडे, टीआरएस, वायएसआरसीपी, बीजेडी आणि आम आदमी पक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावतील, असे मानले जात होते. परंतु हे पक्ष विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत. जरी काँग्रेस आघाडी करत असेल तरीही त्याला विरोध दिसत आहे. त्यामुळे बुधवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांनी बोलावलेली पहिली बैठक काँग्रेस पक्षाऐवजी ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली.

दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू - याशिवाय, जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी केवळ यूपीए नेत्यांनीच सुरू केली नाही. तर एनडीएच्या गोडानेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना एनडीएबाहेरील इतर घटकांसह नेत्यांची भेट घेण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या गणिताचा विचार करता, काँग्रेसकडे जवळपास 23 टक्के मते आहेत. तर एनडीए आघाडीकडे सुमारे 48 टक्के मते आहेत. त्यामुळे एनडीए मजबूत स्थितीत असल्याचे दिसते. पण, जर विरोधी पक्ष YSRCP, TRS, BJD आणि आम आदमी पार्टीला यूपीएमध्ये आणण्यात यशस्वी झाला, तर ते भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीसाठी आव्हान निर्माण करतील.

भाजपची गुप्त निती - NDA आघाडी अंतर्गत 20 लहान पक्ष आहेत, ज्यांची मिळून 10,86,431 मते आहेत, ज्यांचे रूपांतर 5,35,000 मतांमध्ये होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्यांच्या बाजूने करण्यासाठी एनडीएला आणखी 13,000 मतांची आवश्यकता असेल. असे असले तरी, भाजप नेते या विषयावर काहीही बोलण्यास तयार नव्हते. पक्षाच्या एका ज्येष्ठ राष्ट्रीय सरचिटणीस यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या विषयावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाच्या संसदीय मंडळाला देण्यात आले आहेत. "भाजपच्या नेत्यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवारावर भाष्य करू नये, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय पक्षाच्या प्रवक्त्यांनाही अशी वक्तव्ये मीडियाला देण्यापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.