ETV Bharat / bharat

2008 Jaipur Serial Blast Case : २००८ जयपूर साखळी बॉम्बस्फोटातील तीन आरोपींची निर्दोष सुटका - जयपूर साखळी स्फोटातील ३ आरोपी निर्दोष

२००८ साली राजस्थानच्या जयपूरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील चारपैकी तीन आरोपींची आज न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचे प्रकरण बाल मंडळाकडे पाठवण्यात आले आहे.

2008 Jaipur Serial Blast Case
२००८ जयपूर साखळी बॉम्बस्फोट
author img

By

Published : Mar 29, 2023, 6:27 PM IST

जयपूर (राजस्थान) : सुमारे 15 वर्षांपूर्वी जयपूरचं हृदय म्हटल्या जाणाऱ्या परकोटा येथे दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट केले होते. या साखळी बॉंबस्फोटाच्या घटनांनी जयपूर शहर पूर्णतः हादरलं होतं. यात जयपूर शहरातील 8 बॉम्बस्फोटात अनेक घरे उद्ध्वस्त झाली. या स्फोटांमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला तर 186 जण जखमी झाले होते. त्याचे प्रत्यक्षदर्शी आजही ते दृश्य आठवून थरथर कापतात. या बॉम्बस्फोटातील आरोपी पकडले गेले, मात्र बुधवारी चार आरोपींचा मृत्यू संदर्भ न्यायालयाने फेटाळला, त्यांना मुक्त केले. यानंतर आता 'पिंक सिटी' जयपूर मधील रहिवाशांच्या न्यायाच्या आशेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जुन्या जखमा झाल्या ताज्या : इतिहासाची पान चाळल्यावर 13 मे 2008 ही तारीख जयपूरचे लोक विसरू शकत नाहीत. जयपूरच्या कटू आठवणी या दिवसाशी जोडलेल्या आहेत. या दिवशी जयपूरमध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. जयपूरमधील साखळी बॉम्बस्फोटांमुळे जयपूरवासीयांच्या मनावर झालेल्या जखमा आज पुन्हा ताज्या झाल्या आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींची शिक्षा 20 डिसेंबर 2019 रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु बुधवारी उच्च न्यायालयाने दोषींनी फाशीच्या संदर्भासह सादर केलेल्या 28 अपीलांवर निर्णय देताना आरोपी मोहम्मद सलमानचे प्रकरण बाल मंडळाकडे पाठवले.

तपासी अधिकाऱ्यांवर कारवाई : तर सैफ, सैफुर रहमान आणि सरवान आझमी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याचबरोबर तपास अधिकाऱ्यांकडे कायदेशीर माहिती नसल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे. या आरोपींच्या अपिलाच्या रजेवरील सुनावणी आणि राज्य सरकारच्या मृत्यू संदर्भाची सुनावणी गेली तीन वर्षे न्यायालयात प्रलंबित होती. कोरोनाच्या काळात जयपूरमधील या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली नाही. इतकेच नाही तर मिर्झा शादाब बेग, साजिद बट आणि मोहम्मद खालिद हे तीन नामांकित दहशतवादी १५ वर्षांनंतरही पोलिसांना सापडलेले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागा : जयपूरच्या जनतेसाठी हा मोठा धक्का असल्याचे जन अधिकार मंचचे निमंत्रक सूरज सोनी यांनी सांगितले. त्यामुळे दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळेल. तपास अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे त्यांनी सरकारला सांगितले. त्यांनी सांगितले की, ज्यांनी बॉम्बस्फोटात आपल्या प्रियजनांना गमावले ते असमाधानी आहेत कारण त्यांच्या प्रियजनांचे मारेकरी अजूनही जिवंत आहेत.

दोन दिवस रामधुनीचा करणार जप : जयपूर बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जन अधिकार मंचचे कार्यकर्ते आणि शहरातील रहिवासी 2 दिवस रामधुनीचा जप करणार आहेत. एकूण झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटात 71 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 13 मे 2008 रोजी रात्री ८ वाजता शेवटचा स्फोट झाला. यात एक मृत्यू झाला आणि 186 लोक जखमी झाले होते. स्फोटापूर्वी चांदपोळ मार्केटमध्ये जिवंत बॉम्ब सापडला आणि निकामी करण्यात आला.

हेही वाचा: राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्त्व गेले, आसामच्या विधानसभेत गोंधळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.