ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसच! गेहलोत यांना विश्वास, केरळ पॅटर्नचा उल्लेख करुन म्हणाले परंपरा मोडणार - गेहलोत

Rajasthan elections : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकणार असा विश्वास आहे. राज्याची राजकीय परंपरा यातून मोडेल असं ते म्हणालेत. त्यांनी केरळचं उदाहरण दिलय. काँग्रेस सरकारच्या विरोधात कोणतीही अँटी इन्कम्बन्सी नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्री गेहलोत
मुख्यमंत्री गेहलोत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 4:07 PM IST

Updated : Nov 25, 2023, 4:39 PM IST

जोधपूर Rajasthan elections : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावेळी जनता राजकीय परंपरा मोडीत काढेल असं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी केरळचं उदाहरण दिल आहे. केरळमध्ये 40 वर्षात प्रथमच सत्ताधारी सरकार पुन्हा निवडून आलं. त्यांनी आपलं म्हणणं मांडतांना सांगितलं की, काँग्रेसच्या विरोधात कोणतीही सत्ताविरोधी भावना नाही. त्यामुळे काँग्रेसच पुढील सराकर स्थापन करेल. राज्यात पुन्हा त्यांचंच सरकार येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या बाहेरील नेत्यांनी वापरलेल्या भाषेवर गेहलोत यांनी टीका केली. सगळ्याच विरोधी नेत्यांनी राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार पुन्हा येणार नाही असं भाकित केलं आहे.

एक अंडरकरंट दिसत आहे. असं दिसतंय की काँग्रेस सरकारची पुनरावृत्ती होईल. - अशोक गेहलोत, मुख्यमंत्री राजस्थान

केरळचं उदाहरण - आपल्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांनी केरळचं उदाहरण दिलं. कोरोनाव्हायरस सर्व देशभरच नाही तर संपूर्ण जगात कहर करत होता. संपूर्ण देशात आलेल्या या महामारीला हाताळण्यात केरळ सरकारनं चांगली कामगिरी केली. त्या चांगल्या कामाच्या आधारे तिथलं सरकार परत आलं असं ते म्हणाले. राजस्थानच्या लोकांना हे देखील माहीत आहे की, काँग्रेस सरकारनं साथीच्या आजाराच्या हाताळणीसह अनेक आघाड्यांवर उत्कृष्ट काम केलं आहे. यामुळे प्रत्येकवेळी वेगळ्या पक्षाचं सरकार येण्याची परंपरा यावेळी मोडेल असं ते म्हणाले.

लोकांना भडकवण्याचा प्रयत्न - पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांची भाषा प्रक्षोभक असताना काँग्रेसनं आपला प्रचार विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित केला. गेहलोत पुढे म्हणाले की, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसह बाहेरून आलेल्या भाजपा नेत्यांनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही असं गेहलोत म्हणाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. जनतेला आता समजलंय की, पुन्हा काँग्रेसचं सरकार येणार असं दिसतय, असंही गेहलोत म्हणाले.

लोकांसाठी चांगल्या योजना - गेहलोत पुढे म्हणाले की, आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी आणि 'आरोग्य हक्क' साठी चांगले कायदे केले. लोकांसाठी चांगल्या योजना आणल्या आणि आरोग्याची हमी दिली. 'रेड डायरी' वरुन गेहलोत यांच्यावर टीका होत आहे. त्याचाही गेहलोत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, भाजपा घोडे बाजारात गुंतली आहे. मात्र त्यांच्याही आता लक्षात आलं आहे की, त्यांची डाळ राजस्थानात शिजणार नाही. त्यामुळे ते काहीही मुद्दे काढत आहेत, असं गेहलोत म्हणाले. गेहलोत पुढे म्हणाले की, भाजपा नेत्यांनी वापरलेली भाषा चिथावणीखोर आहे. आम्ही त्यांना स्थानिक मुद्द्यांवर बोलण्याचे, आमच्या योजनांवर बोलण्याचे आव्हान दिले होते, मात्र त्यावर कुणीच काही बोलले नाही.

भाजपा घोडे बाजार करुन निवडून आलेली सरकारे पाडत आहेत. त्यांनी स्वीकारलेली पद्धत लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. आम्ही राजस्थानमध्ये सर्वतोपरी प्रयत्न केले आणि सरकार पडू दिले नाही. जनता आमच्यासोबत होती आणि असेल. - अशोक गेहलोत, मुख्यमंत्री राजस्थान

काँग्रेस जिंकली तर मुख्यमंत्री कोण - काँग्रेसने पुन्हा सरकार स्थापन केल्यास मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न गेहलोत यांना विचारला असता मुख्यमंत्रिपदाची निवड करण्याचा निर्णय पक्षाच्या हायकमांडवर असेल, असं ते म्हणाले. आमच्या परंपरेनुसार, काँग्रेस पक्षाचे केंद्रीय युनिट नवनिर्वाचित पक्षाच्या आमदारांचे मत घेण्यासाठी निरीक्षक पाठवेल आणि त्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी पक्षाच्या अध्यक्षांना अधिकार देणारा ठराव मंजूर केला जाईल. हायकमांडचा निर्णय सर्वांना मान्य आहे, असे ते म्हणाले.

सरकारची विश्वासार्हता उच्च - जोधपूरमध्ये मतदान केल्यानंतर गेहलोत म्हणाले की, त्यांच्या सरकारची विश्वासार्हता जास्त आहे. त्यांना अशी भावना आहे की सरकार पुन्हा निवडून येईल. राजस्थानमध्ये प्रचारासाठी बाहेरून आलेले भाजपा नेते पुढील पाच वर्षे राज्यात पाऊलही ठेवणार नाहीत. ही मोदींची निवडणूक नाही. ही राज्य विधानसभेची निवडणूक आहे. पाच वर्ष ते राज्यात दिसणार नाहीत. आम्ही इथेच राहू, जनतेसोबत, असंही गेहलोत म्हणाले.

काँग्रेसची आश्वासने - काँग्रेसनं सत्तेत आल्यास सात आश्वासनं दिली आहेत. पक्षाची सत्ता कायम राहिल्यास, कुटुंबाच्या प्रमुख महिलेला वार्षिक १०,००० रुपये मानधन आणि एलपीजी सिलिंडर ५०० रुपयात देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचा लाभ 1.05 कोटी कुटुंबांना होईल. यासह इतर आश्वासनांच्यामुळे थेट परिणाम कुटुंबांच्या रोजीरोटीवर होईल आणि निवडणुकीच्या निकालावर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा..

राजस्थानात 'राजे' येणार की 'परंपरा' बदलणार? विधानसभेच्या 199 जागांवर मतदान सुरु, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Last Updated : Nov 25, 2023, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.