हनुमानगड (राजस्थान) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील गोगामेडी इंथ परिवर्तन संकल्प यात्रेच्या चौथ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. यावेळी गडकरींनी राजस्थानमध्ये भाजपाचं सरकार प्रचंड बहुमतानं स्थापन करण्याचं यावेळी बोलताना केलं. राजस्थानमध्ये भाजपाचं सरकार आणल्यानं स्मार्ट शहरांमध्ये नव्हे तर, स्मार्ट गावांमध्ये रोजगार मिळेल. जेव्हा राजस्थान,दिल्लीत भाजपाचं सरकार असेल, तेव्हा तुमचं भविष्य दुहेरी इंजिनच्या सरकारमुळं बदलेल असा दावा त्यांनी केला.
यात्रेला दाखवला हिरवा झेंडा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोगामेडी धाम इंथ पुष्पहार अर्पण करून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं मला राजस्थानच्या शेतकऱ्यांची पाण्याची समस्या माहितीय. राज्यांमध्ये 1965 सालचा पाणी वाद अजूनही सुरू आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचा उल्लेख करत तीन नवीन रेल्वे ओव्हरब्रिज मंजूर केले.
गेहलोत सरकारला तरुणांची चिंता नाही : यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधरा राजे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. गहलोत सरकारला तरुणांची काळजी नाही, असं म्हणत त्यांनी तरुणावर हल्लाबोल केलाय. राज्यात अमली पदार्थांचं व्यसन, पेपरफुटीमुळं तरुणांचं भवितव्य टांगणीला लागलंय. गेहलोत सरकारला शेतकर्याला आत्महत्या करायला भाग पाडतंय. त्यांना शेतकऱ्यांची अजिबात काळजी नाही. कर्जमाफीऐवजी राज्यातील सुमारे 19 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याचं काम केल्याचा आरोप राजे यांनी केलाय.
राज्य सरकार हटवण्याची शपथ घ्या : भाजपा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, हे राजस्थान आहे, तालिबान नाही. या परिवर्तन यात्रेमुळं राजस्थानची शान परत येईल. गडकरींनी या राज्याला जे दिलं ते कोणीही देऊ शकत नाही. गहलोत सरकार हटवायचं आहे. राज्यातील 25 पैकी 25 खासदारांना जिंकून द्या असं देखील ते म्हणाले. सनातनचा नायनाट करणार्यांनी उघड्या कानांनी ऐकावं, या सनातनला संपवण्यासाठी गझनवीही आले होते, मात्र त्यांना तेथील मातीनं धडा शिकवला. शेतकर्यांच्या उत्कर्षासाठी, तरुणांना बळकट करण्यासाठी भाजपानं परिवर्तण यात्रेचं आयोजन केलंय. आगामी निवडणुकीत राजस्थानमध्ये परिवर्तनाचं चिखलात कमळ फुलणार फुलणार असल्याचं ते म्हणाले.
हेही वाचा -