ETV Bharat / bharat

सुरतच्या पाच जणांनी बनवले सौरउर्जेवर चालणारे जलशुद्धीकरण यंत्र, राजस्थानच्या 700 गावांना मिळणार शुद्ध पाणी - surat of gujarat

पाच वर्षांच्या संशोधनानंतर सुरतच्या पाच तरुणांनी खारे पाणी पिण्यायोग्य बनविणारे सौरऊर्जेवर चालणारे उपकरण बनवले आहे. सध्या दररोज 1500 गॅलन समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरुणांच्या या प्रयोगाने प्रभावित होऊन राजस्थान सरकार बाडमेर भागात याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. वाचा संपूर्ण बातमी...

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 24, 2022, 10:31 AM IST

सुरत (गुजरात) - गुजरातमधील सुरतच्या पाच तरुणांनी दररोज 1500 गॅलन समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारानंतर आता राजस्थानमधील बारमेर भागातील 700 गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. सुरत येथे अभियांत्रिकी विद्यार्थी यश तरवाडी, भूषण परवते, जान्हवी राणा, नीलेश शहा आणि चिंतन शहा यांनी हे संशोधन केले आहे. जे किनारपट्टीच्या भागात पाणी टंचाई कमी करण्यास तसेच खारे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी शुद्ध करण्यात मदत करू शकते. हे उपकरण बनवण्यासाठी त्यांनी पाच वर्षे संशोधन केले आहे.

माहिती देताना

उपकरणाने प्रभावित राजस्थान सरकार - अभियंत्यांच्या या गटाने सौरऊर्जेवर चालणारे उपकरण बनवले आहे. याद्वारे समुद्राच्या पाण्याशिवाय क्षारयुक्त खारे पाणी पिण्यायोग्य बनवता येते. त्यामुळे जलजन्य संसर्ग रोखण्यासही मदत होईल. विद्यार्थ्यांच्या या अभ्यासाकडे राजस्थान सरकारचेही लक्ष लागले आहे. या दृष्टिकोनामुळे, लवकरच राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील 700 गावांना पिण्यायोग्य पाणी देण्याचे लक्ष्य आहे.

दररोज 1,500 गॅलन खारे पाणी पिण्यायोग्य बनवते - त्यांनी विकसित केलेले हे उपकरण, समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात म्हणजेच पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करते. हे उपकर पूर्णपणे सौर उर्जेवर चालते. या तंत्रज्ञानामुळे ओलपाड तालुक्यात दररोज 1500 गॅलन खारे पाणी पिण्यायोग्य केले जात असून त्याचा वापर जवळपासच्या गावातील रहिवासी करत आहेत.

सांडपाण्यावर प्रक्रिया - सौरऊर्जेवर चालणारे हे उपकरण विजेची बचत करतो. दुसरीकडे आरओ सिस्टिमच्या पाण्यात अनेक पोषक तत्वांचा तुटवडा आहे. तिथे त्याचा दीर्घकाळ वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. दुसरीकडे, या सोलर प्लांटमधून गोळा होणारे कोणतेही पाणी खनिजयुक्त असेल. तसेच, आरोग्यासाठी फायदेशीर असण्याबरोबरच ते जलजन्य संक्रमणास प्रतिबंध करण्यास मदत करेल.

राजस्थान सरकारने तरुणांशी संवाद साधला - या संदर्भात चिंतन शाह यांनी सांगितले, बाडमेर भागात आरओ प्रणालीत पाण्यावर प्रक्रिया केली जाते. यात पिण्यात अयोग्य असलेले 50 टक्के अशुद्ध पाणी फेकले जाते. शहा यांच्या म्हणण्यानुसार, राजस्थानमधील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून लवकरच आम्ही तुमच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तेथील पाणी शुद्ध करू, परिणामी 700 गावांतील लोकांना याचा लाभ मिळणार आहे, असे सांगितले.

गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळही खूप प्रभावित - गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांच्या प्रकल्पावर खूप प्रभावित असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आजही सुरत आणि दक्षिण गुजरातमध्ये वॉटर जेट उद्योग आहेत, जे सर्वाधिक पाणी वापरतात. येथेही ते या तंत्रज्ञानाच्या सहायाने त्यांचा उद्योग चालवू शकतील. याशिवाय, यामुळे केवळ विजेचीच बचत होणार नाही तर वाया जाणारे पाणी शुद्ध करून ते पुन्हा वापरता येईल.

हेही वाचा - हुबळी येथे ट्रक बसच्या भीषण अपघातात 8 जण ठार, मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.