ETV Bharat / bharat

Samastipur Railway Track Stolen : कधी रेल्वे इंजिन तर कधी लोखंडी पूल, आता चक्क रेल्वे रुळांचीच चोरी! - रेल्वे रुळांची चोरी

समस्तीपूर रेल्वे विभागातून पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर आली आहे. यापूर्वी येथून रेल्वे इंजिन चोरीचे प्रकरण समोर आले होते. आता येथे रेल्वे ट्रॅकचे भंगार चोरीला गेले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच ही चोरी झाली असावी, अशी शंका व्यक्त होत आहे.

Railway Track
रेल्वे रुळ
author img

By

Published : Feb 6, 2023, 11:00 AM IST

समस्तीपूर (बिहार) : बिहारच्या समस्तीपूर रेल्वे विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याने पूर्णिया कोर्ट स्थानकातील रेल्वे इंजिनच्या भंगाराची विक्री केली होती. तो प्रश्न अजून निकाली लागला नसतानाच आता तेथून चक्क रेल्वे ट्रॅकचे भंगार विकल्याची माहिती समोर येत आहे! समस्तीपूर रेल्वे बोर्डाच्या सूत्रांनुसार, मधुबनीच्या लोहट शुगर मिल ते पंडोल स्टेशनपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे भंगार चुकीच्या पद्धतीने विकण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आरपीएफचे दक्षता पथक तपासात गुंतले : या रेल्वे ट्रॅक भंगार चोरी प्रकरणाबाबत दरभंगा आरपीएफ पोस्टमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरपीएफच्या दक्षता पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वास्तविक या विभागातील पांडोळ स्थानकापासून लोहट साखर कारखान्यापर्यंत रेल्वेमार्ग टाकण्यात आला होता. वर्षानुवर्षे हा साखर कारखाना बंद असल्याने ही लाईन वापरात नाही. आता रेल्वे ट्रॅक आणि त्याचे भंगार चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे.

अधिकाऱ्यांच्याच संगनमताने चोरी? : चोरीची ही मोठी घटना समोर आल्यानंतर विभागात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमता शिवाय ही चोरी होऊ शकली नसल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत विभागीय चौकशीसोबतच दक्षता पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. संपूर्ण प्रकरण तपासानंतरच स्पष्ट होईल. अद्याप या प्रकरणाचा कोणताही सुगावा हाती लागलेला नाही. मात्र या चोरीबाबत विभागात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रेल्वेने रेल्वे विभागाच्या सुरक्षा आयुक्तांसह 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये झांझारपूर चौकीचे प्रभारी श्रीनिवास आणि मधुबनीचे जमादार मुकेश कुमार सिंह यांचा समावेश आहे. 24 जानेवारीला ही संपूर्ण बाब समोर आली होती.

पोलिसाची रिक्षा चालकाला मारहाण : बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका ई-रिक्षाचालक आणि पोलिस अधिकाऱ्यामध्ये हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. कर्तव्यावर असलेल्या मथुरापूर पो.कॉ.पोलिस अधिकाऱ्याने ई-रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. समस्तीपूरच्या बाजार समितीजवळ ई-रिक्षाचालकाची पोलिस अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली. त्यानंतर या दोघांमध्ये रस्त्याच्या मधोमध हाणामारी झाली. स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये घटनेचा व्हिडिओ बनवला जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : Five Judges In Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाला आज मिळतील पाच नवे न्यायाधीश ; संक्षिप्तपणे जाणून घ्या या न्यायाधीशांबद्दल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.