नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट ट्विटरकडून तात्पुरते बंद करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डरवरून देण्यात आली. तसेच सध्या त्यांचं अकाऊंट सुरू असून डाटा स्टोअर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यात नमूद केले आहे. मात्र ट्विटरने राहूल गांधींचे ट्विटर अकाऊंट कोणत्या कारणामुळे बंद केले होते, याविषयीचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही.
संघर्ष कायम राहणार -
ट्विटरने अकाऊंट तात्पुरते बंद केले असले तरी राहूल गांधी सोशल मिडियावर सक्रीय राहणार आहे. ते इतर सामाजिक माध्यमातून लोकांशी संपर्क कायम ठेवणार असून जनतेच्या समस्या मांडणार असल्याचे काँग्रेसतर्फे केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.