वायनाड ( केरळ ) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयावर काल हल्ला ( rahul gandhis office ransacked in kerala ) झाला. या हल्ल्यानंतर सीपीएमची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या आठ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी राहुल यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. काँग्रेसने सीपीएम सरकार आणि भाजप या दोघांवर आरोप केले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे सुमारे 100 कार्यकर्ते निषेध मोर्चात सहभागी झाले होते आणि त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांनी सांगितले की, 'सुमारे 80-100 कार्यकर्ते होते. त्यापैकी आठ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
केरळच्या डोंगराळ भागातील जंगलांभोवती बफर झोन तयार करण्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोप करत विद्यार्थी संघटनेने निषेध केला. विरोधी पक्षनेते व्ही डी साठेसन यांनी या घटनेवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हा हल्ला अराजकता आणि गुंडगिरी दर्शवतो. त्यांनी ट्विट केले की, 'राहुल गांधी यांच्या वायनाड येथील खासदार कार्यालयावर एसएफआयच्या गुंडांचा भयानक हल्ला. ही अराजकता आणि गुंडगिरी आहे. सीपीआय(एम) संघटित माफिया बनली आहे. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र अशा निदर्शनांचे हिंसक रूप घेणे चुकीचे आहे. विजयन म्हणाले, "काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाही पद्धतीने निषेध करण्याचा अधिकार आहे. मात्र अशा आंदोलनांना हिंसक वळण लागणे ही चुकीची प्रवृत्ती आहे. सरकार दोषींवर कडक कारवाई करेल.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी शाखा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांनी केरळमधील वायनाड येथील राहुल गांधी यांच्या कार्यालयावर केलेल्या कथित हल्ल्याचा काँग्रेसने शुक्रवारी निषेध केला आणि आरोप केला की सीपीआय(एम) आणि भाजपमधील 'घृणास्पद सौदेबाजी' उघड झाली आहे. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही दावा केला की, भाजप राहुल गांधींविरोधात अंमलबजावणी संचालनालयाचा दुरुपयोग करत आहे. त्याचवेळी सीपीआय(एम) काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या कार्यालयावर हल्ला करत आहे.
त्यांनी ट्विट केले, 'राहुल गांधी यांच्या कार्यालयावर एसएफआयच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. केरळमधील सीपीआय(एम) विषारी भाजपला खूश करण्यासाठी इतके झुकले आहे की एकीकडे भाजप त्यांच्या विरोधात ईडीचा दुरुपयोग करत आहे आणि सीपीआय(एम) केरळमधील त्यांच्या कार्यालयात हिंसाचार करत आहे. त्यांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
हेही वाचा : Hyderabad Riots : दंगलीच्या एक दिवस आधी मुख्य सूत्रधार सुब्बाराव हैदराबादला आले - रेल्वे पोलीस