वॉशिंग्टन: काँग्रेसचे नेते राहुल गांधी कॅलिफोर्नियाच्या मोहब्बतें की दुकान कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांना विदेशातील भारतीयांशी संवाद साधला. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी आठवडाभराच्या दौऱ्यासाठी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले आहेत. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, की भारतातील राजकारणातील प्रत्येक गोष्टीवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस) नियंत्रण आहे. लोकांना धमकावले जात आहे. लोकांना घाबरवण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांचा वापर केला जात आहे. राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यासाठी या आठवड्यातच सोमवारी पासपोर्ट जारी करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी पासपोर्ट देण्यावरून वाद निर्माण झाला होता.
-
#WATCH| Congress' Rahul Gandhi in response to a question from 'Bay Area Muslim community' says," The way you (Muslims) are feeling attacked,I can guarantee Sikhs,Christians,Dalits,Tribals are feeling the same. What is happening to Muslims in India today happened to Dalits in… pic.twitter.com/sukYLT9Ctp
— ANI (@ANI) May 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH| Congress' Rahul Gandhi in response to a question from 'Bay Area Muslim community' says," The way you (Muslims) are feeling attacked,I can guarantee Sikhs,Christians,Dalits,Tribals are feeling the same. What is happening to Muslims in India today happened to Dalits in… pic.twitter.com/sukYLT9Ctp
— ANI (@ANI) May 31, 2023#WATCH| Congress' Rahul Gandhi in response to a question from 'Bay Area Muslim community' says," The way you (Muslims) are feeling attacked,I can guarantee Sikhs,Christians,Dalits,Tribals are feeling the same. What is happening to Muslims in India today happened to Dalits in… pic.twitter.com/sukYLT9Ctp
— ANI (@ANI) May 31, 2023
पासपोर्ट देण्याला भाजपने केला होता विरोध:भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींना पासपोर्ट देण्यास विरोध केला होता. जर राहुल गांधींना पासपोर्ट दिला तर ते विदेशात जाऊन पोलीस तपासावर प्रभाव टाकू शकणार आहेत. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की, राहुल यांच्या भेटीवर कोणत्याही न्यायालयाने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. प्रवास करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यांना थांबवू शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
यापूर्वी लंडन दौरा ठरला होता वादग्रस्त : यापूर्वी राहुल यांचा लंडन दौरा वादात सापडला होता. केंब्रिज विद्यापीठातील बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी भाजप सरकावर कडाडून टीका केली होती. ते म्हणाले की, माध्यमे आणि न्यायव्यवस्थाही केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. पेगाससद्वारा मोदी सरकारने माझ्या मोबाईलवर हेरगिरी केली आहे. ही माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी केंब्रिजमधील भाषणावरून भाजप खासदारांनी संसदेत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे पुरेसे कामकाज झाले नव्हते.
हेही वाचा-
- Rahul Gandhi On US Visit : राहुल गांधी पोहोचले सॅन फ्रान्सिस्कोला, दोन तास विमानतळावर ताटकळल्यानंतर पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
- Ashok Gehlot Vs Sachin Pilot : राहुल गांधींचे भावनिक आवाहन; गेहलोत-पायलट एकत्र
- Wrestlers Protest : कुस्तीपटूंवरील कारवाईवर राहुल गांधींचे ट्विट; म्हणाले, 'राज्याभिषेक पूर्ण, आता अहंकारी राजा..'