ETV Bharat / bharat

भाजपचे 50 टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुमचे? राहुल गांधींचा टोला - राहुल गांधी

काँग्रेसचे 682.21 कोटी रुपये उत्पन्न होते. तर खर्च हा सुमारे 998.158 कोटी रुपये होता. काँग्रेसचा उत्पन्नाच्या तुलनेत जादा खर्च होता

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Aug 28, 2021, 3:40 PM IST

नवी दिल्ली - भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर शनिवारी जोरदार टीका केली आहे. भाजपची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली आहे, तुमची किती? असे ट्विट करत राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भाजपच्या संपत्तीत 3,623.28 कोटी रुपयांनी वाढली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालानुसार भाजपला मिळणाऱ्या इलेक्टोरल बाँडमध्ये वाढ झाल्याने पक्षाच्या संपत्तीत वाढ झाली आहे. एडीआरच्या रिपोर्टनुसार 2019-2020 मध्ये भाजपचे 3,623.28 कोटी रुपयांचे उत्पन्न होते. तर खर्च सुमारे 1,651.022 कोटी रुपये होता. काँग्रेसचे 682.21 कोटी रुपये उत्पन्न होते. तर खर्च हा सुमारे 998.158 कोटी रुपये होता. काँग्रेसचा उत्पन्नाच्या तुलनेत जादा खर्च होता.

हेही वाचा-केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अनादराने बोलणे अस्वीकारार्ह - वर्षा गायकवाड

काय आहे इलेक्टोरल बाँड ?

राजकीय पक्षांना थेट देणगीतून पैसे मिळविण्यासाठी निवडणूक रोख्यांचा (इलेक्टोरल बाँड) पर्याय असतो. यामध्ये पारदर्शकता नसल्याचा विरोधी पक्षांकडून आरोप करण्यात येतो. असे असले तरी भारत निवडणूक आयोगाने काही अटींच्या अधीन राहून निवडणूक रोख्यांना परवानगी दिली आहे. या रोख्यांबाबत राजकीय पक्षांनी कार्यक्रमात अथवा जाहीर कार्यक्रमात किंवा माध्यमांमध्ये जाहीर उल्लेख करू नये, असे बंधन घालण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा-Mysuru gang-rape : पीडित तरुणी आपल्या घरी मुंबईला परतली; पाच संशयितांना अटक

भाजपच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार पक्षाला 2017-18 च्या तुलनेत 2019-20 मध्ये इलेक्टोरल बाँडमधून स्वच्छेने मिळणाऱ्या देणग्यांचे प्रमाण 21 टक्क्यांनी वाढले आहे. 2017-18 मध्ये 989 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बाँडपैकी 210 कोटी रुपये हे स्वच्छेने मिळाले आहे. तर हे 2019-20 मध्ये भाजपला एकूण 2,555 कोटी रुपये हे इलेक्टोरल बाँडच्या विक्रीतून मिळाले आहे. त्यामधील 3,427 कोटी रुपये हे स्वच्छेने दिलेल्या देणगीतून मिळालेले आहेत.

इलेक्टोरल बाँडच्या विक्रीत काँग्रेसची परिस्थिती भाजपच्या उलट आहे. काँग्रेसला इलेक्टोरल बाँडच्या विक्रीतून मिळणाऱ्या देणग्यांचे प्रमाण हे 2019-20 मध्ये 2018-19 च्या तुलनेत 25 टक्क्यांनी कमी आहे. काँग्रेसला 2018-19 मध्ये 998 कोटी रुपये बाँड विक्रीतून मिळाले आहेत. तर 2019-20 मध्ये काँग्रेसला बाँड विक्रीतून 682 कोटी रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा-...तर चालू वर्षात डिसेंबर अखेर 18 वर्षांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण होईल- इंडियन मेडिकल असोसिएशन

राजकीय पक्षांनी असा केला खर्च

भाजपच्या वार्षिक लेखापरीक्षणानुसार भाजपने निवडणूक मोहिमेमध्ये 400 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपने इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर 249 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर वर्तमानपत्रातील निवडणुक प्रचारांच्या जाहिरातीकरिता 47.38 कोटी रुपये खर्च केले आहे.

विविध राजकीय पक्षांच्या अहवालानुसार त्यांना इलेक्टोरल बाँडमधून मिळणाऱ्या रकमेची आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2019-20 मध्ये इलेक्टोरल बाँडच्या विक्रीतून, 29.25 कोटी रुपये, तृणमूल काँग्रेसने 100.46 कोटी रुपये, डीएमकेने 45 कोटी रुपये आणि आपने 18 कोटी रुपये मिळविले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.