पाटणा : मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशावर 15 मे 2023 पर्यंत बंदी घालत न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती संदीप कुमार यांच्या खंडपीठासमोर राहुल गांधी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.
कनिष्ठ न्यायालयात होणार होते हजर : पाटणाच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना 25 एप्रिल 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्यास बजावले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी हा आदेश रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करून दिलासा दिला. आता राहुल गांधी यांना पाटण्याच्या कनिष्ठ न्यायालयात हजर राहावे लागणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 मे 2023 रोजी होणार आहे.
मोदी आडनावावर केली होती टीका : राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकमध्ये मोदी आडनावावर टीका केली होती. या प्रकरणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी पाटण्याच्या दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना यापूर्वीच दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यामुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली होती. आता याप्रकरणी पाटणा कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा : राहुल गांधींनी मोदी समुदायाला चोर म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप सुशील कुमार मोदी यांनी केला होता. याप्रकरणी 2019 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात राहुल गांधी यांनी न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना जामीन मिळाला. या खटल्यात सुशील कुमार मोदी यांच्यासह ५ साक्षीदार आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींना 25 एप्रिल रोजी पाटणा येथील न्यायालयात हजर राहावे लागणार नाही.
हेही वाचा- Shooters Seen In Jail CCTV : उमेश पाल हत्याकांड घडवण्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज आले पुढे, कारागृहात भेटले सगळे शूटर्स