गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केल्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही तिखट प्रश्न केले आहेत. Rahul Gandhi Questions Modi On Drugs महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या भूमीवर हे विष कोण पसरवतंय हे पंतप्रधान मोदींनी सांगावे, असा थेट घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
आतापर्यंत चौकशी का झाली नाही काँग्रेस नेते म्हणाले, Rahul Gandhi पंतप्रधान, उत्तर द्या की हजारो कोटींची नशा गुजरातमध्ये पोहोचते, गांधी पटेलांच्या पवित्र भूमीवर हे विष कोण पसरवत आहे, वारंवार अंमली पदार्थ जप्त करूनही बंदर मालकाची आतापर्यंत चौकशी का झाली नाही असा थेट प्रश्न राहुल यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आम्ही किती काळ गप्प बसणार राहुल गांधी यांनी गुजरातमधील ड्रग्जच्या जप्तीची तुलना ड्रग्ज तस्करीवर आधारित अमेरिकन ड्रामा सीरिज 'नार्कोस'शी केली आणि विचारले की गुजरातमध्ये ड्रग कार्टेल चालवणाऱ्या 'नार्कोस'ला आतापर्यंत एनसीबी आणि इतर सरकारी यंत्रणांनी का पकडले नाही, केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये बसून 'माफिया मित्रांना' अभय देणारे लोक कोण आहेत, ते म्हणाले, पंतप्रधान, आम्ही किती काळ गप्प बसणार, याचे उत्तर आपल्याला द्यावे लागले असही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - Sarpanch And Mayor Bill सरपंच आणि नगराध्यक्षांची जनतेतून थेट निवड होणार, विधानसभेत दोन्ही विधेयक मंजूर