ETV Bharat / bharat

राहुल गांधी आज लखीमपूरमध्ये पोहोचण्याची शक्यता - लखीमपूर हिंसाचार घटना

लखीमपूरमध्ये राजकारण तापले आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर प्रियंका गांधींनाही अटक झाली आहे. अशातच राहुल गांधी हे लखीमपूरला जाणार आहेत.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Oct 6, 2021, 1:01 AM IST

लखनौ - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लखीमपूरला जाण्यासाठी लखनौला आज (६ ऑक्टोबर) पोहोचणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील सुत्राच्या माहितीनुसार राहुल गांधी हे चार्टर विमानाने लखनौला येऊ शकतात. मात्र, त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, सुत्राच्या माहितीनुसार राहुल गांधींनी कार्यक्रम निश्चित केला आहे.

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी गेल्या तीन दिवसांपासून लखीमपूरला जाण्यासाठी सीतापूरला ठाण मांडून बसल्या आहेत.

संबंधित बातमी वाचा-लखीमपूर खीरी हत्याकांत : भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर चढवली गाडी; आठ जणांचा मृत्यू

सुरुवातीला पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांना प्रोत्साहन देण्यासाठी राहुल गांधींनी ट्विट केले होते. मात्र, प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधींनीही लखनौला येण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी हे लखनौवरून लखीमपूरला जाणार आहेत.

संबंधित बातमी वाचा-Lakhimpur Kheri Violence : जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनाने नाकारली परवानगी

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल हे लखीमपूरला जाण्यासाठी लखनौ विमानतळावर पोहोचले होते. मात्र प्रशासनाने त्यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगीदेखील दिली नव्हती. त्यामुळे संतापलेल्याबाघेल यांनी विमानतळावरच धरणे आंदोलन केले. पोलिसांच्या विरोधामुळे त्यांना काँग्रेस मुख्यालयापर्यंतही जाता आले नाही. अशा परिस्थितीत राहुल गांधी लखीमपूरला कसे पोहोचतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातमी वाचा-मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डरशिवार व FIR दाखल न करता 28 तास कोठडीत ठेवले - प्रियंका गांधी

प्रियंका गांधींनी सरकारवर साधला निशाणा-

अटकेनंतर पीएम मोदींवर निशाणा साधताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डरशिवाय व FIR दाखल न करता मला 28 तास नजरकैदेत ठेवले. मात्र शेतकऱ्यांना चिरडणाऱ्याला अजून का अटक करण्यात आली नाही? पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्यासमवेत ८ जणांना अटक केली आहे. काही जणांनी लखनौवरून त्यांचे कपडे आणले. त्यांनाहा पोलिसांनी अटक केली आहे. हा अन्याय असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीतापूरमध्ये ठाण मांडले आहे. प्रियंका गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्याचवेळी मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत कँडल मार्चचे आयोजन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.