ETV Bharat / bharat

Rahul Gandhi in London : देशात भाजपविरोधी वातावरण, 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू - राहुल गांधी - 2024 निवडणूक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटले की, विरोधी पक्षांमध्ये सध्या चांगला समन्वय असून 2024 च्या निवडणुकीसाठी आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की, सत्ताधारी भाजपविरोधात प्रचंड राग असून भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेल्या सामान्य लोकांनी ते उघड केले आहे.

Rahul Gandhi in London
राहुल गांधी
author img

By

Published : Mar 6, 2023, 7:22 AM IST

नवी दिल्ली : भारतातील विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी एकत्र लढण्यासाठी एकमेकांशी बोलत आहेत, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी लंडनमध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनशी झालेल्या संवादादरम्यान प्रश्नांना उत्तरे देत होते.

'विरोधी पक्षांमध्ये चांगला समन्वय' : राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. सध्या चर्चा सुरू आहे. मी त्यापैकी अनेकांना ओळखतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याशी लढून त्यांना पराभूत करणे गरजेचे आहे. काही धोरणात्मक मुद्दे आहेत ज्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे. राहुल म्हणाले की, 'काही राज्ये अतिशय सोपी आहेत तर इतर राज्ये अधिक जटिल आहेत. विरोधी पक्ष हे मतभेद दूर करण्यास सक्षम आहेत. ते म्हणाले की, 'वेगवेगळी राज्ये आहेत जी वेगळ्या पद्धतीने काम करतात. परंतु जर आम्ही विरोधकांना एका विचाराभोवती एकत्र करू शकलो तर आम्ही भाजपला पराभूत करू शकतो'.

'भाजपशी एकजुटीने लढण्याची गरज' : 2024 मध्ये भाजपशी एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, त्यांच्या नुकत्याच झालेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान, विरोधी ऐक्य निर्माण करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आपली भूमिका बजावण्यास तयार होता. ते म्हणाले की 'ही यात्रा एक कल्पना आहे. हे एक मॉडेल आहे, ज्याचे मूळ रूप भाजप सोडून सर्व पक्षांना मान्य आहे. या यात्रेची मूळ रचना सर्वांना बरोबर घेऊन जायची आणि सामाजिक न्यायाबद्दल बोलण्याची आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, लघु आणि मध्यम उद्योगांचा नाश तसेच काही मोजक्या लोकांच्या हातात प्रचंड संपत्ती जमा होणे, यावर निवडणूक लढविल्या जाणार आहे.

'भाजपविरोधात प्रचंड रोष' : ते म्हणाले की, लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. या यात्रेत भाजपविरोधातील संतापाचे पडसाद उमटले. हे राष्ट्रीय माध्यमात चालवल्या जात असलेल्या कथनाच्या विरोधात होते. त्यांनी दावा केला की, भारतातील विरोधक सत्ताधारी भाजपपेक्षा मोठ्या शक्तीच्या विरोधात उभे आहेत. ते म्हणाले की, 'भारतातील विरोधक आता एकट्या भाजपशी लढत नाहीत. आरएसएस आणि भाजपने भारतातील जवळपास सर्वच संस्था काबीज केल्या आहेत. त्यामुळे समान संधीची कल्पना अस्तित्वात नाही. युनायटेड किंगडममध्ये दोन पक्ष निवडणुका लढवतात आणि संस्था तटस्थ असतात. ते भारतातून आता गेले आहे.

हेही वाचा : AAP MP Raghav Chadha Targets BJP : आप खासदार राघव चढ्ढांनी साधला भाजपवर निशाणा, मनिष सिसोदिया प्रकरण

  • "2000 sq km of our territory is being controlled by the PLA. The PM himself has stated that not a single inch of our land has been taken. This has destroyed our position to negotiate with Beijing."

    Full video here: https://t.co/HFhNNquUs6 pic.twitter.com/NESMgrq73h

    — Congress (@INCIndia) March 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवी दिल्ली : भारतातील विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी एकत्र लढण्यासाठी एकमेकांशी बोलत आहेत, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी लंडनमध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनशी झालेल्या संवादादरम्यान प्रश्नांना उत्तरे देत होते.

'विरोधी पक्षांमध्ये चांगला समन्वय' : राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. सध्या चर्चा सुरू आहे. मी त्यापैकी अनेकांना ओळखतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याशी लढून त्यांना पराभूत करणे गरजेचे आहे. काही धोरणात्मक मुद्दे आहेत ज्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे. राहुल म्हणाले की, 'काही राज्ये अतिशय सोपी आहेत तर इतर राज्ये अधिक जटिल आहेत. विरोधी पक्ष हे मतभेद दूर करण्यास सक्षम आहेत. ते म्हणाले की, 'वेगवेगळी राज्ये आहेत जी वेगळ्या पद्धतीने काम करतात. परंतु जर आम्ही विरोधकांना एका विचाराभोवती एकत्र करू शकलो तर आम्ही भाजपला पराभूत करू शकतो'.

'भाजपशी एकजुटीने लढण्याची गरज' : 2024 मध्ये भाजपशी एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, त्यांच्या नुकत्याच झालेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान, विरोधी ऐक्य निर्माण करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आपली भूमिका बजावण्यास तयार होता. ते म्हणाले की 'ही यात्रा एक कल्पना आहे. हे एक मॉडेल आहे, ज्याचे मूळ रूप भाजप सोडून सर्व पक्षांना मान्य आहे. या यात्रेची मूळ रचना सर्वांना बरोबर घेऊन जायची आणि सामाजिक न्यायाबद्दल बोलण्याची आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, लघु आणि मध्यम उद्योगांचा नाश तसेच काही मोजक्या लोकांच्या हातात प्रचंड संपत्ती जमा होणे, यावर निवडणूक लढविल्या जाणार आहे.

'भाजपविरोधात प्रचंड रोष' : ते म्हणाले की, लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. या यात्रेत भाजपविरोधातील संतापाचे पडसाद उमटले. हे राष्ट्रीय माध्यमात चालवल्या जात असलेल्या कथनाच्या विरोधात होते. त्यांनी दावा केला की, भारतातील विरोधक सत्ताधारी भाजपपेक्षा मोठ्या शक्तीच्या विरोधात उभे आहेत. ते म्हणाले की, 'भारतातील विरोधक आता एकट्या भाजपशी लढत नाहीत. आरएसएस आणि भाजपने भारतातील जवळपास सर्वच संस्था काबीज केल्या आहेत. त्यामुळे समान संधीची कल्पना अस्तित्वात नाही. युनायटेड किंगडममध्ये दोन पक्ष निवडणुका लढवतात आणि संस्था तटस्थ असतात. ते भारतातून आता गेले आहे.

हेही वाचा : AAP MP Raghav Chadha Targets BJP : आप खासदार राघव चढ्ढांनी साधला भाजपवर निशाणा, मनिष सिसोदिया प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.