ETV Bharat / bharat

Mehagai Hatao Rally : आम्हाला हिंदुत्ववाद्यांना घालवून, हिंदूंचं राज्य आणायचंय - राहुल गांधी

भारत हा देश हिंदुंचा आहे. हिंदुत्त्ववाद्यांचा नाही. आज देशासमोर विचारधारेची ही नवीन लढाई आहे. आपल्याला हिंदू आणि हिंदुत्त्ववाद्यांमध्ये अंतर काय आहे, हे समजून घ्यावे लागेल. मी हिंदु आहे. मात्र, हिंदुत्त्ववादी नाही, असे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi in Mehagai Hatao Rally Jaipur )

rahul gandhi
राहुल गांधी
author img

By

Published : Dec 12, 2021, 4:04 PM IST

Updated : Dec 12, 2021, 4:33 PM IST

जयपूर (राजस्थान) - आम्हाला हिंदुंचे राज्य आणायचे आहे हिंदुत्त्ववाद्यांचे नाही, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. ते जयपूर येथे आयोजित कांग्रेसच्या 'महंगाई हटाओ' रॅली संबोधित करत होते. (Rahul Gandhi in Mehagai Hatao Rally) यावेळी त्यांनी वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारला जबाबदार ठरवले. ते म्हणाले, महागाई आणि कोरोनाच्या संकटामुळे देशाची जी परिस्थिती आहे ती नागरिकांच्या समोर आहे.

कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी

भारत हा देश हिंदुंचा आहे. हिंदुत्त्ववाद्यांचा नाही. आज देशासमोर विचारधारेची ही नवीन लढाई आहे. आपल्याला हिंदू आणि हिंदुत्त्ववाद्यांमध्ये अंतर काय आहे, हे समजून घ्यावे लागेल. मी हिंदु आहे. मात्र, हिंदुत्त्ववादी नाही. कारण, हिंदुला सत्य पाहिजे. तो सत्यासोबत उभा राहतो. तर हिंदुत्तवाद्याला सत्ता पाहिजे. तो सत्तेसाठी कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो.

हेही वाचा - PM modi's account hacked: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक ; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा

हिंदु तो आहे जो सर्वांना जवळ करतो. या देशातून हिंदुत्त्वाद्यांना परत काढायचे आहे आणि देशात हिंदुंची सत्ता आणायची आहे, असेही ते म्हणाले.

Last Updated : Dec 12, 2021, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.