ETV Bharat / bharat

Panjab Assembly Election 2022 : कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची 27 जानेवारीला जालंधरमध्ये व्हर्चूअल सभा - राहुल गांधी जालंधर रॅली

काँग्रेस नेते राहुल गांधीही ( Rahul Gandhi Panjab Tour ) 27 जानेवारी रोजी जालंधरमध्ये संध्याकाळी 4 वाजता व्हर्चूअस रॅली घेणार आहे. यासंदर्भात पंजाब काँग्रेसकडून एक नवीन घोषणाही देण्यात ( Congress New Slogan For Assembly Election ) आली आहे.

rahul gandhi
rahul gandhi
author img

By

Published : Jan 25, 2022, 8:46 PM IST

चंदीगड – आगामी काळात पंजाबमध्ये विधानसभेसाठी ( Panjab Assembly Election 2022 ) मतदान होणार आहे. प्रत्येक राजकीय कक्ष प्रचार करतो आहे. काँग्रेस नेते राहुल गांधीही ( Rahul Gandhi Panjab Tour ) 27 जानेवारी रोजी जालंधरमध्ये संध्याकाळी 4 वाजता व्हर्चूअस रॅली घेणार आहे. यासंदर्भात पंजाब काँग्रेसकडून एक नवीन घोषणाही देण्यात ( Congress New Slogan For Assembly Election ) आली आहे. 'नई सोच नया पंजाब' अशी ही घोषणा आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये भाजपही 'नया पंजाब भजपा के साथ' असा नवा नारा दिला आहे.

राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर -

राहुल गांधी हे पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते 117 उमेदवारांसह सुवर्ण मंदिर, दुर्गियाना मंदिर आणि भगवान वाल्मिकी मंदिर येथे दर्शन घेतील. तसेच राहुल गांधी दिल्लीत पक्षाचे नेते आणि माध्यमांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींचे पंजाब दौऱ्याचे वेळापत्रक शेअर करताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी यासंदर्भातील ट्विट केले आहे. राहुल गांधी हे 27 जानेवारी रोजी पंजाबमध्ये येणार आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पंजाबमध्ये त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे, असे सिद्धू यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे.

पंजाबमध्ये 117 जागांवर मतदान -

पंजाबमध्ये निवडणुकांची घोषणा झाली असून 27 मार्च 2022 रोजी पंजाब विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. पंजाबमध्ये 117 जागांवर मतदान होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. दहा मार्च रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखांसोबतच कोरोना नियमावलीही जारी केली आहे.

हेही वाचा- Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत घट, १० जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.