नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सोमवारी ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी राहुल ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल झाले. यावेळी ट्रॅक्टरला कृषी कायद्यांना विरोध दर्शविणारे फलक लावले होते.
ट्रॅक्टरमध्ये राहुल गांधींसोबत बसलेल्या कार्यकर्त्यांनीही कृषी कायद्यांना विरोध दर्शविणारे फलक हाती घेतलेले होते. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे अशी मागणी या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करण्याची मागणी राहुल गांधींनी यावेळी केली.
हेही वाचा - कारगिल विजय दिनी राष्ट्रपतींची जवानांना आदरांजली, पंंतप्रधान मोदींकडून जवानांच्या शौर्याचे स्मरण