हैदराबाद - तेलंगाणा राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर रचकोंडा वाहतूक पोलिसांनी नाविन्यपूर्ण मार्गाने वाहन चालकांसाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी कौतूक केले आहे.
हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीवर भाजपाचा आक्षेप
जनजागृतीसाठी अवतरला यमराज -
एलबी नगरचे वाहतूक पोलीस निरीक्षक नागामल्लू यांनी पोलीस सांस्कृतिक मंडळाद्वारे कोत्तापेटा चौरस्ता येथे वाहन चालकांसाठी जनजागृती मोहीम राबवली आहे. यावेळी यमराजाच्या वेशात येत वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या या नाविन्यपूर्ण जनजागृही मोहिमेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
तेलंगाणा राज्य सरकारने नुकताच जीओ 68 जाहीर केला आहे, ज्यानुसार प्रत्येकाने कर्तव्याची बाब म्हणून प्रत्येकाने मास्क घालावे, गर्दीपासून दूर रहावे, स्वच्छता ठेवावी, आरोग्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोरोनाला आपल्या दारापर्यंत पोहोचू नये म्हणून खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मास्क न वापरल्यास होणार 1 हजार दंड
तेलंगाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळण्याचे आवाहन रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी नागरिकांना केले आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्यांकडून 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही महेश भागवत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग याचिका सुनावणी : "तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात"; न्यायालयाची सिंगांवर बोचरी टीका