सुलतानपूर (उ.प्र) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील 341 कि.मी लांब पूर्वांचल एक्सप्रेसवेचे (Purvanchal expressway inauguration) आज उद्घाटन केले. भारतीय वायू दलाच्या C 130 हर्क्युलिस विमानातून पूर्वांचल महामार्गावरील हवाई पट्टीवर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदी (pm modi) यांनी हे कार्य केले.
हेही वाचा - Ban On Zakir Naik IRF : गृह मंत्रालयाने झाकीर नाईकच्या एनजीओवरील बंदी अजून ५ वर्षांसाठी वाढवली
यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल (governor anandiben patel) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath news) यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. पूर्वांचल द्रुतगती (Purvanchal expressway) मार्गावर 3.2 किमी लांब हवाई पट्टी बांधण्यात आली आहे. लढाऊ विमानांना आपातकालीन लँडिंग करता यावे यासाठी ही हवाई पट्टी बांधण्यात आली आहे. आज भारतीय वायू दलाचे C 130 हर्क्युलिस विमान (c 130 hercules) या हवाई पट्टीवर उतरले. यात पंतप्रधान मोदी स्वार होते.
341 किमी लांबीचा हा महामार्ग उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला गाझीपूरशी जोडतो. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अंदाजी 22 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आज हवाई पट्टीच्या ठिकाणावर विविध विमानांचा एअर शो होणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाचे साक्षी ठरणार आहेत.