मुंबई : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मिशन गुंतवणुकीसंदर्भात दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान भगवंत मान यांनी पंजाबमध्ये फिल्मसिटी बनवण्याची घोषणा केली आहे. भगवंत मान म्हणाले की, पॉलिवूड हा खूप मोठा उद्योग आहे. बॉलीवूडचे अनेक चित्रपट पंजाबमध्ये शूट केले जातात आणि अनेक बॉलिवूड चित्रपट पंजाबशी संबंधित कथांवर बनवले जातात. नजीकच्या काळात ते पॉलिवूड आणि बॉलीवूडचे विलीनीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून सरकारला महसूल मिळेल आणि स्थानिक कलाकारांनाही काम मिळेल.
-
Big announcement by CM @BhagwantMann!!
— AAP Punjab (@AAPPunjab) January 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पंजाब में बनेगी Film City 🎬🎞️
"हम पंजाब में एक बेहद बड़ी Film City प्लान कर रहे हैं। उसके लिए मैं Production Houses से मिलूंगा और आग्रह करूंगा कि आइए पंजाब में आकर अपने Studios बनाइए!"
—CM @BhagwantMann pic.twitter.com/vn9lwbZA7K
">Big announcement by CM @BhagwantMann!!
— AAP Punjab (@AAPPunjab) January 22, 2023
पंजाब में बनेगी Film City 🎬🎞️
"हम पंजाब में एक बेहद बड़ी Film City प्लान कर रहे हैं। उसके लिए मैं Production Houses से मिलूंगा और आग्रह करूंगा कि आइए पंजाब में आकर अपने Studios बनाइए!"
—CM @BhagwantMann pic.twitter.com/vn9lwbZA7KBig announcement by CM @BhagwantMann!!
— AAP Punjab (@AAPPunjab) January 22, 2023
पंजाब में बनेगी Film City 🎬🎞️
"हम पंजाब में एक बेहद बड़ी Film City प्लान कर रहे हैं। उसके लिए मैं Production Houses से मिलूंगा और आग्रह करूंगा कि आइए पंजाब में आकर अपने Studios बनाइए!"
—CM @BhagwantMann pic.twitter.com/vn9lwbZA7K
मुंबईतील उद्योगपतींची भेट : यावेळी बोलताना भगवंत मान यांनी 'लाफ्टर चॅलेंज'चा उल्लेख केला. आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी सांगून मुंबईशी आपल्या अनेक आठवणी जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'पंजाब सरकार राज्यात उद्योग उभारण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात नवीन आयाम प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री भगवंत मान मुंबईतील उद्योगपतींची भेट घेतील आणि त्यांच्याशी पंजाबमधील गुंतवणूक आणि येथील सद्यस्थितीबाबत चर्चा करतील. या सोबतच त्यांना पंजाब सरकारच्या गुंतवणूक धोरणांची माहिती दिली जाईल. पंजाबच्या औद्योगिक क्षेत्राची उन्नती आणि पंजाबमध्ये गुंतवणूक करून नफा मिळविण्यासाठी व्यावसायिक कोणते प्लॅटफॉर्म वापरू शकतात यावरही चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री भगवंत मान एका कार्यक्रमात सहभागी होऊन व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, पंजाब सरकारच्या योजना आणि खुल्या गुंतवणुकीबाबत ते उद्योगपतींशी सविस्तर चर्चा करणार आहेत.
योगी आदित्यनाथही आले होते : या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुकेश अंबानीसह अनेक उद्योगपतींची भेट घेतली होती. योगी आदित्यनाथ यांनी देखील उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचा संकल्प केला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. या फिल्मसिटीच्या मार्फत राज्यातील युवकांना त्यांच्या राज्यातच रोजगार देण्याचे आदित्यनाथ यांचे लक्ष आहे.
'तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी' : या दौऱ्यामुळे एकीकडे राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल तर दुसरीकडे तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईतील उद्योगपतींसमोर पंजाब ही संधी आणि विकासाची भूमी म्हणून दाखवणार असल्याचे भगवंत मान म्हणाले. ते म्हणाले की, पंजाब हे देशातील सर्वाधिक पसंतीचे गुंतवणुकीचे ठिकाण असून राज्यात नवीन गुंतवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मुंबई दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री भगवंत मान यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
हेही वाचा : Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची घेतली भेट