ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश : मास्क न लावल्याबद्दल 'कोरोनावर निबंध' लिहिण्याची शिक्षा

author img

By

Published : Dec 6, 2020, 7:34 PM IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे 'रोको-टोको मोहीम' राबविण्यात येत असल्याचे ग्वाल्हेरचे जिल्हा दंडाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी सांगितले आहे. सार्वजनिक प्रबोधनाबरोबरच दुर्लक्ष करणार्‍यांविरोधात चालान पाठविले जात आहे. त्याबरोबरच त्यांना खुल्या कारागृहात पाठविण्याचेही काम केले जात आहे. तेथे त्यांना 'कोरोनावर निबंध' लिहिण्यास सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेश कोरोना न्यूज
मध्य प्रदेश कोरोना न्यूज

ग्वाल्हेर - मध्य प्रदेशात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासन आणि प्रशासन कडक उपाययोजना करीत आहेत. ग्वाल्हेरमध्ये प्रशासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, जो कोणी मास्कशिवाय सापडेल, त्याला मुक्त तुरुंगात राहण्यासोबतच कोरोनावर निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाईल.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे 'रोको-टोको मोहीम' राबविण्यात येत असल्याचे ग्वाल्हेरचे जिल्हा दंडाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी सांगितले आहे. सार्वजनिक प्रबोधनाबरोबरच दुर्लक्ष करणार्‍यांविरोधात चालान पाठविले जात आहे. त्याबरोबरच त्यांना खुल्या कारागृहात पाठविण्याचेही काम केले जात आहे. शनिवारी रूप सिंह स्टेडियममधील सुमारे 20 लोकांना खुल्या तुरुंगात पाठविण्यात आले होते आणि त्यांना 'कोरोना या विषयावरील एक निबंध'ही लिहिण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा - त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे खास 'आयुर्वस्त्र'

जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह म्हणाले की, शहरातील लोक सामाजिक अंतर पाळत नाहीत. तसेच मास्क न घालता फिरणारे लोक सापडले आहेत. विशेषत: युवक मास्क न घालता वाहनांमधून फिरतात. यासह काही लोक योग्य प्रकारे मास्क न लावता केवळ गळ्यात लटकवूनही फिरत आहेत. कोरोना संसर्ग लक्षात घेता सर्वांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजीव सिंह म्हणाले की, शनिवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या सुमारे २० तरुणांना रूपसिंग स्टेडियममधील मुक्त तुरूंगात आणले गेले. या प्रत्येकाला कोरोना या विषयावर एक निबंध लिहायला सांगितला. शहरातील दैनंदिन तपासणीदरम्यान जे मास्क नसलेले आढळतील, त्यांना मुक्त कारागृहात नेले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - धर्मांतरविरोधी अध्यादेशांतर्गत उत्तर प्रदेशात पहिली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.