नवी दिल्ली : आज 14 फेब्रुवारी, म्हणजे व्हॅलेंटाईन डे! एकीकडे देशातील सर्वसामान्य जनता आणि विशेषत: तरुणाई 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, पण आजच्याच दिवशी 4 वर्षांपूर्वी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात भारताचे वीर जवान शहीद झाले होते. खरे तर आज त्यांनाही स्मरण करण्याचा दिवस आहे. त्या हल्ल्याच्या जखमा आणि वेदना ह्या अजूनही ताज्या आहेत. आज संपूर्ण भारत पुलवामा हल्ल्यातील शहीदांना साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहतो आहे.
सीआरपीएफचे ४० जवान शहीद : 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या जवानांवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. पहाटे ३.३० वाजता 78 बसेसमध्ये 2500 सीआरपीएफ जवानांना घेऊन बसचा ताफा जम्मूहून निघाला होता. मात्र पुलवामामध्येच जैश या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी या जवानांवर हल्ला केला. हा ताफा पुलवामा येथे पोहोचताच रस्त्याच्या पलीकडून येणाऱ्या कारने या ताफ्यातील एका बसला धडक दिली. ही कार स्फोटकांनी भरलेली होती. हे वाहन सैनिकांच्या ताफ्यावर आदळताच मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.
पीओकेत घुसून घेतला बदला : पुलवामा येथील भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा भारतीय सैन्याने चोख बदला घेतला. जैश-ए-मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली याचा बदला घेण्याची तयारी सुरू झाली होती. 26 फेब्रुवारी 2019 च्या पहाटे, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पीओकेमध्ये घुसून हवाई हल्ले केले आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्यात अनेक दहशतवादी ठार झाले.
हल्ल्यात शहीद झालेले जवान : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांची संपूर्ण यादी येथे आहे. नसीर अहमद (जम्मू आणि काश्मीर), जयमल सिंग (पंजाब), टिळक राज (हिमाचल प्रदेश), रोहितश लांबा (राजस्थान), विजय सोरेंग (झारखंड), वसंत कुमार व्ही.व्ही. (केरळ), सुब्रमण्यमजी (तामिळनाडू), मनोजकुमार बेहरा (ओडिशा), जीडी गुरु एच (कर्नाटक), नारायण लाल गुर्जर (राजस्थान), महेश कुमार (उत्तर प्रदेश), हेमराज मीना (राजस्थान), पीके साहू (ओडिशा), संजय राजपूत (महाराष्ट्र), कौशल कुमार रावत (उत्तर प्रदेश), प्रदीप सिंग (उत्तर प्रदेश), श्याम बाबू (उत्तर प्रदेश), अजितकुमार आझाद (उत्तर प्रदेश), मनिंदर सिंग अत्री (पंजाब), बबलू संत्रा (पश्चिम बंगाल), अश्विनी कुमार काओची (मध्य प्रदेश), नितीन शिवाजी राठोड (महाराष्ट्र), भगीरथ सिंग (राजस्थान), वीरेंद्र सिंग (उत्तराखंड), अवधेश कुमार यादव (उत्तर प्रदेश), रतनकुमार ठाकूर (बिहार), संजय कुमार सिन्हा (बिहार), जीत राम (राजस्थान), मोहन लाल (उत्तराखंड), प्रदीप कुमार (उत्तर प्रदेश), राम वकील (उत्तर प्रदेश), पंकजकुमार त्रिपाठी (उत्तर प्रदेश), रमेश यादव (उत्तर प्रदेश), सुखजिंदर सिंग (पंजाब), कुलविंदर सिंग (पंजाब), अमित कुमार (उत्तर प्रदेश), विजय कु. मौर्य (उत्तर प्रदेश), सी. शिवचंद्रन (तामिळनाडू), सुदीप बिस्वास (पश्चिम बंगाल), मनिंदर सिंग अत्री (पंजाब), मनेश्वर बसुमतरी (आसाम)
हेही वाचा : National Women's Day 2023: ... म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिन, जाणून घ्या इतिहास