कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठपलं आहे. त्यामुळे राजकीय पक्ष पुन्हा प्रचारामध्ये दंग झाले आहेत. यापूर्वी पहिल्या चारही टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळाला होता. त्यामुळे आता पाचव्या टप्प्यात तरी शांततेत मतदान पार पडेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगालमध्ये तीन प्रचारयात्रा घेणार आहेत. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील काही ठिकाणी प्रचारसभा घेतली. या टप्प्यामध्ये सहा जिल्ह्यांमधील ४५ जागांसाठी १७ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात उत्तर २४ परगणामधील १६, दार्जिलिंगच्या पाच, नदियामधील ८, जलपाईगुडीमधील ७ आणि कॅलिमपोंगच्या एका जागेवर मतदान होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वर्धमान, कल्याणी आणि बारासातमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचारयात्रा होणार आहेत. तर दुसरीकडे अमित शाहदेखील कित्येक ठिकाणी प्रचारयात्रा आणि प्रचारसभा घेणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून, दोन मे रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा : 'दीदी राजीनामा तयार ठेवा, 2 मे ला द्यावा लागणार'; अमित शाह यांचा हल्लाबोल