ETV Bharat / bharat

PT Usha News : पीटी उषा पत्रकारांसमोर रडत म्हणाली, 'माझ्या अकादमीचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न झाला' - पीटी उषा कॅमेऱ्यासमोर रडली

भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा हिने तिच्या उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्सच्या कंपाऊंडमध्ये अवैध बांधकाम होत असल्याचा आरोप केला आहे. तिने याप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्याची विनंती केली आहे.

PT Usha
पीटी उषा
author img

By

Published : Feb 5, 2023, 10:23 AM IST

Updated : Feb 5, 2023, 11:02 AM IST

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ची अध्यक्षा पीटी उषा हिने शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केला. तिने केरळमधील तिच्या उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्सच्या कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच यास जबाबदार असलेल्यांनी व्यवस्थापनाशी गैरवर्तन केले असल्याचेही तिचे म्हणणे आहे.

कंपाऊंडमध्ये अवैध बांधकाम चालू केले : पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, 'काही लोक उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्सच्या कंपाऊंडमध्ये घुसले आणि त्यांनी तेथे बांधकाम करणे सुरू केले. व्यवस्थापनाने त्यांना विरोध केला असता त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांनी त्यांच्याकडे पानगड पंचायतीची परवानगी असल्याचा दावा केला. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर काम थांबवण्यात आले'. ती म्हणाल्या की, उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्सला गेल्या अनेक दिवसांपासून अशा छळ आणि सुरक्षेच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे, ती राज्यसभेच्या सदस्य झाल्यानंतर यात वाढ झाली आहे. पीटी उषा हिला जुलै 2022 मध्ये भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली होती.

मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी : पीटी उषा पुढे म्हणाली, 'उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्स मध्ये अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे. येथे अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. येथे शिकणाऱ्या मुलींची सुरक्षितता ही आमची मुख्य प्राथमिकता आहे. आम्ही अजूनही परिसरात कुंपण बांधू शकलो नाही. येथे रात्रीच्या वेळी लोकं अंमली पदार्थांचे व्यसन करून कंपाऊंडमध्ये घुसतात आणि ड्रेनेजमध्ये घाण करतात'. पीटी उषा हिने याप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्याची विनंती केली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेची अध्यक्षा : दिग्गज धावपटू पीटी उषा हिची उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्स अत्याधुनिक सुविधांसह संभाव्य स्तरांवर खेळांचा प्रचार आणि सराव वाढवण्यासाठी कार्यरत आहे. पीटी उषा ही भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके आणि सात रौप्यपदके पटकावली आहेत. 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत तिचे पदक एका सेकंदाच्या अवघ्या 1/100 व्या अंतराने हुकले होते. या ऑलिंपिकमधील तिची 55.42 सेकंदांची वेळ अजूनही राष्ट्रीय विक्रम आहे. पीटी उषा हिची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

हेही वाचा : Asian Cricket Council Meeting : जय शाह यांचा दणका! पाकिस्तानकडून काढून घेतले जाऊ शकते आशिया कपचे यजमानपद

Last Updated : Feb 5, 2023, 11:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.