बेळगाव (कर्नाटक) Procession of woman With Shoe Necklace : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा शहरात काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी महिलेला चपलेचा हार घालून तिची शहरातून धिंड काढल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याची माहिती आहे. घटप्रभा नगरच्या मृत्युंजय सर्कलमध्ये काही लोकांनी ही धिंड काढल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत असे बोलले जात आहे की, हे अमानवी कृत्य काही लोकांच्या टोळक्याने केले होते. ज्यांनी महिलेवर हनीट्रॅप करून पैसे उकळल्याचा आरोप केला आणि तिला ब्लॅकमेल केले.
महिलेवर अधिकाऱ्याचा छळ करण्याचा आरोप: माहितीप्रमाणे, काही दिवसांपूर्वी या महिलेने एका अधिकाऱ्याचा छळ केल्याची तक्रार स्थानिक लोकांनी केली होती. यापूर्वीही ही महिला त्यांना त्रास देत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली होती. याच घटनेचा एक भाग म्हणून महिलेला चपलेचा हार घालून तिची धिंड काढली गेली. दरम्यान तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सध्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पीडित महिलेने सांगितले की, गेल्या महिन्याच्या 30 तारखेला एका संस्थेचे काही लोक माझ्याकडे आले होते आणि मला 5 लाख रुपये देण्याची धमकी दिली.
पीडितेला विवस्त्र करून मारहाण: पैसे न दिल्यास तिला हद्दपार करण्याची धमकी दिल्याचे पीडितेने सांगितले. यावर पीडित महिला म्हणाली की, ती भीक मागून उदरनिर्वाह करते. या कारणास्तव तिने पैसे देण्यास नकार दिला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पुन्हा काही लोक तिच्या घरी आले आणि तिला पुन्हा 5 लाख रुपये देण्यास सांगितले. पीडितेने पैसे न दिल्याने या लोकांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी तिला विवस्त्र केले आणि चपलेचा हार घालून धिंड काढल्याचा आरोप महिलेने केला आहे.
काय म्हणाला महिलेचा पती: मीडियाशी बोलताना पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास 36 लोक त्याच्या घरी आले आणि तो जेवण करत असताना त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. जमावाने त्याच्या जिभेलाही दुखापत केली. यानंतर त्यांनी त्याच्या पत्नीला रॉडने मारहाण केली, विवस्त्र केले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबाला हद्दपार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने एका अधिकाऱ्याकडे दाद मागितली आहे, अशी धमकी त्यांनी दिली. त्यांनी पत्नीच्या गळ्यात चपलेचा हार घातला आणि तिला घरातून पोलीस ठाण्यात नेले, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा:
- Drug Racket Caught In Mumbai : 'एनसीबी'ने इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, 9 जणांना अटक
- Man Killed Wife Daughter : थरारक! पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीनं निर्घृण हत्या, पती कॅमेऱ्यासमोर म्हणाला...
- Brother Sexually Assaults Minor Sister : सख्ख्या भावाचा अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता गरोदर