ETV Bharat / bharat

राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा 'महामाप'; न्यायालयीन चौकशी करावी - प्रियांका गांधी - राम मंदिर घोटाळा चौकशी

राम जन्मभूमी जमीन घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी यांनी एक पोस्ट लिहली आहे. 2 कोटी किमतीची जमीन केवळ पाच मिनिटात पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टकडून 18.5 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. म्हणजे जमिनीची किंमत प्रतिसेकंदाला 5.5 लाख रुपयांनी वाढली. मात्र, हे सर्व पैसे भारताच्या जनतेचा आहे. जो त्यांनी मंदिराच्या निर्मितीसाठी दान दिला होता.

प्रियांका गांधी
प्रियांका गांधी
author img

By

Published : Jun 16, 2021, 1:20 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या संबंधित जमिनीच्या खरेदी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारावर आपले मत व्यक्त केले आहे. गांधी यांनी या कथित घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने आपल्या निगरानीमध्ये चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राम जन्मभूमी जमीन घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी यांनी एक पोस्ट लिहली आहे. 2 कोटी किमतीची जमीन केवळ पाच मिनिटात पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टकडून 18.5 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. म्हणजे जमिनीची किंमत प्रतिसेकंदाला 5.5 लाख रुपयांनी वाढली. मात्र, हे सर्व पैसे भारताच्या जनतेचा आहे. जो त्यांनी मंदिराच्या निर्मितीसाठी दान दिला होता.

जमीन खरेदी-विक्रीच्या संबंधित नावे आणि नोंदणी कार्यालयातील साक्षीदारांची नावे समान आहेत. तर यात एक साक्षीदार मंदिराच्या ट्रस्टचे सदस्य आहेत. जे आरएसएसचे माजी विभागीय कार्यवाहक होते. तर दूसरा साक्षीदार भाजपा नेता आणि अयोध्याचे महापौर आहेत, असा दावा प्रियांका गांधी यांनी केला आहे. तसेच गांधी यांच्या मते काही वृत्तांनुसार राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत श्री नृत्य गोपाल दास यांच्याकडूनही ट्रस्टच्या कामकाजात मनमानी कारभार आणि अपारदर्शका असल्याचा आरोप केला जात असल्याचेही म्हटले आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टची स्थापना पंतप्रधान मोदींनी केली होती.पंतप्रधानाच्या जवळचे लोक याचे सदस्य आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही जबाबदारी आहे, की प्रभु श्रीरामच्या नावाने भक्तांकडून मिळालेला एकएक पैसा मंदिर निर्माणाच्या कार्यासाठी वापरला पाहिजे, घोट्याळ्यात नाही. असा टोलाही प्रियांका गांधी यांनी लगावला आहे.

लोकांच्या आस्थेमध्ये देखील स्वार्थ पाहणे म्हणजे कोट्वधी भारतीयांच्या आस्थेला ठेच पोहोचवण्यासारखे असून ते महापाप असल्याची टीकाही प्रियांका गांधी यांनी यावेळी केली. त्यांनी आग्रह केला आहे, की न्यायालयाच्या निर्देशानुसार या मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे देशवासीयांच्या वतीने आमची मागणी आहे की, न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.