सीतापुर - उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये काँग्रेसच्या महासिचव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम १४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नजरकैदेत ठेवलेल्या प्रियंका गांधींवर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त केला असून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा - लखीमपूर खीरी हत्याकांड : पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका गांधींचा दिसला "दुर्गावतार"
प्रियंका गांधी यांना आज कोर्टासमोर हजर केली जाण्याचीही शक्यता आहे. पोलिसांनी हवं तर मला अटक करावी, पण मी शेतकरी कुटुंबीयांना भेटल्याशिवाय परतणार नाही, अशी ठाम भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतली आहे. त्यांच्यावर शांतता भंग करण्यासह अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापूर्वी प्रियंका गांधी-वाड्रा सीतापूर मध्ये पोलीस कोठडीत होत्या. गांधी मागील 24 तासांहून अधिक काळ पोलिसांच्या नजरकैदेत होत्या. त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप केला. प्रियंका गांधी यांना 4 ऑक्टोबरला पहाटे साडे चार वाजता अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा - लखीमपूर खीरी हत्याकांड : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना लखनऊ पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रियंका गांधी यांनी ट्विट करत मोदींना लखीमपूरला येण्याचे आव्हान केले होते. प्रियंका गांधींनी म्हटले होते की, लखीमपूरला या आणि शेतकऱ्यांची अवस्था समजून घ्या. त्यांचे संरक्षण करणे हा तुमचा धर्म आहे. सगळ्यांच्या हक्कांचे रक्षण करणं हा संविधानाचा धर्म आहे. ज्यावर तुम्ही शपथ घेतली आणि त्याप्रती तुमचं कर्तव्य देखील आहे. जय हिंद..जय किसान"