हैदराबाद - देशात कोरोनाचा कहर असून विदारक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो पैसे भरूनही रुग्ण हाती लागत नाहीये. काही ठिकाणी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशीच एक घटना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयामध्ये घडली आहे. तब्बल 52 लाख रुपये फीस भरल्यानंतरही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
भावना आणि कल्याण हे डॉक्टर दाम्पत्य हैदराबादच्या कोमपल्ली येथील रहिवासी आहेत. गेल्या 22 एप्रिलला ती कोरोना पाझिटिव्ह आढळली. तेव्हा बेगमपेट कॉर्पोरेट रुग्णालयात तीला दाखल करण्यात आले. उपचारानंतर ती कोरोना निगेटि्वह आली. मात्र, इतर आरोग्याच्या समस्या तीला जाणवत होत्या. त्यामुळे तीला इको उपाचाराची गरज असल्याने जुबली हिल्समधील एका रुग्णालयात दाखल केले. तीच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी इको पाईपची योग्यरित्या व्यवस्था गेली नव्हती. त्यामुळे तीचे 2 ते 3 युनिट रक्त कमी झाले. ऑक्सिजनची पातळी देखील खालावली. गुरुवारी पहाटे साडेचार वाजता तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती मरण पावली.
रुग्णालय व्यवस्थापनाने फेटाळले आरोप -
रुग्णालयात दाखल केल्यापासून आम्ही आतापर्यंत 52 लाख रुपये भरले आहेत. परंतु डॉक्टर आणि कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप भावनाचे पती कल्याण यांनी केला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे. डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कोणतीही चूक केली नाही. तीचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले होते. पण तिचा मृत्यू झाला, असे रुग्णालय व्यवस्थापनाने माध्यमांना सांगितले.