ETV Bharat / bharat

Manoj Pandey New Army Chief : तिन्ही सेना एकमेकांच्या समन्वयाने काम करतील -लष्कर प्रमुख - सेना दलाचे नवे लष्कर प्रमुख

मनोज पांडे यांनी सैन्यदलाचा पदभार स्वीकारल्यानंतर मीडियाशी बोलताना म्हणाले, माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. तसेच, माझ्यावर लष्कराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ही सन्मानाची बाब समजतो. (Manoj Pandey New Army Chief ) पुढे पांडे म्हणाले की, तिन्ही सेना एकमेकांच्या समन्वयाने काम करतील.

Manoj Pandey New Army Chief
Manoj Pandey New Army Chief
author img

By

Published : May 1, 2022, 1:04 PM IST

नवी दिल्ली - जनरल मनोज पांडे हे आता देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. त्यांनी काल(दि. 30 एप्रिल)रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी आता एमएम नरवणे यांची जागा घेतली आहे. (News Army chief 2022) विशेष बाब म्हणजे जनरल मनोज पांडे हे कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे पहिले अधिकारी आहेत, जे लष्करप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळतील. जनरल पांडे यांचा लष्करप्रमुख पदापर्यंतचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.

इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश - जनरल मनोज पांडे हे पूर्व कमांडचे कमांडिंग ऑफिसर होते आणि त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ पदही भूषवले आहे. जनरल मनोज पांडे यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिळाले आहेत. जनरल पांडे यांचा जन्म डॉ. सीजी पांडे आणि प्रेमा यांच्या पोटी झाला, जे ऑल इंडिया रेडिओचे उद्घोषक आणि होस्ट होते. त्यांचे कुटुंब नागपूरचे आहे. प्राथमिक शालेय शिक्षणानंतर जनरल मनोज पांडे नॅशनल डिफेन्स अकादमीत रुजू झाले. एनडीएनंतर, त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी झाले. 3 मे 1987 रोजी शासकीय दंत महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या अर्चना सालपेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता - जनरल मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये बॉम्बे सॅपर्स, कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बर्ली, यूकेचा एक भाग होते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले आणि ईशान्य भारताच्या माउंटन ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर म्हणून नियुक्त झाले. लेफ्टनंट कर्नलच्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर, त्यांनी इथिओपिया आणि एरिट्रियामधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणून काम केले.

मेजर जनरल पदावर बढती- जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर 117 इंजिनियर रेजिमेंटचेही नेतृत्व केले आहे. ऑपरेशन पराक्रम दरम्यान ते रेजिमेंट कमांडर होते. त्यानंतर त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू येथे प्रवेश घेतला आणि हायर कमांड कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांना हेडक्वॉर्टर 8 माउंटन डिव्हिजनमध्ये कर्नल क्यू म्हणून नियुक्त करण्यात आले. मेजर जनरल पदावर बढती मिळालेले, जनरल पांडे यांनी पश्चिम लडाखमधील उच्च उंचीवरील ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेल्या 8व्या माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी लष्कराच्या मुख्यालयातील मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टरेटमध्ये अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून काम केले. लेफ्टनंट जनरल पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी दक्षिण कमांडच्या चीफ ऑफ स्टाफची जबाबदारीही सांभाळली आहे.

हेही वाचा - Russia-Ukraine war - युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून रशियन सैन्याला युद्ध न करण्याचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.