इस्लामबाद (पाकिस्तान) - पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही या संपूर्ण घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून इम्रान खानवर मोठा आरोप केला आहे. पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणीही त्यांनी ट्विट करून सार्वजनिक केली आहे. शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून लिहिले की, 'इमरान नियाझी अराजकता पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप आणि खोटे बोलतात. (Firing on Imran Khan) त्यांनी लिहिले की, सरकारने पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना इम्रानच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पूर्ण न्यायालय आयोग स्थापन करण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय संस्थांना कमकुवत करण्याचा त्यांचा गेम प्लॅन लोकांसमोर आणणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
हल्लेखोराला हेरलं आणि अटकही - गुरुवार (3 नोव्हेंबर)रोजी दुपारच्या सुमारास पाकिस्तानच्या वझिराबादमधील झफर अली खान चौकात इम्रान खान यांच्या पक्षाचा ‘हकीकी आझादी मोर्चा’ पोहोचला होता. हा मोर्चा मुख्य चौकात आल्यानंतर अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आला आणि घटनास्थळी एकच खळबळ उडाली. लोकांची पळापळ सुरू झाली. या गोंधळात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला हेरलं आणि अटकही केली आहे.
इम्रान खान यांनी गंभीर आरोप केले - विशेष म्हणजे 3 नोव्हेंबरला गुजरांवाला येथे एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोळी लागल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयकडून एक निवेदन जारी करण्यात आले. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात इम्रानच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे म्हटले आहे. ज्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि मेजर जनरल फैसल यांना हल्ल्यासाठी जबाबदार धरण्यात आले होते.
ही व्हिडिओ क्लिपही आपल्याकडे असल्याचा दावा - या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही व्हीलचेअरवर बसून वक्तव्य केले होते. मला मारण्याची योजना आखण्यात आली होती, असे त्याने म्हटले होते. त्यासाठी बंद खोलीत कट रचण्यात आला. ही व्हिडिओ क्लिपही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. या हल्ल्यासाठी त्यांनी तीन जणांना जबाबदार धरले. या तीन लोकांमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री आणि मेजर जनरल फैसल यांचे नाव आहे असा दावाही त्यांनी केला आहे.
गृहमंत्र्यांनी इम्रानवर हल्लाबोल केला - पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनीही इम्रान खान यांच्या आरोपांवर जोरदार हल्ला चढवला आहे. इम्रानला चार गोळ्या लागल्या नसल्याचा दावा त्यांनी केला. त्याच्या दुखापतीची कथाही खोटी आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून न्यायालयीन आयोगाची स्थापना किती दिवसांत केली जाते, हे तूर्तास पाहिले जाईल असही ते म्हणाले आहेत.