ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी केली तेजसमधून सफर, संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचा अभिमान असल्याची दिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरूमध्ये तेजस विमानातून हवाई प्रवास केला. तेजस हे हलके भारतीय बनावटीचे विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सने त्याची निर्मिती केली आहे.

पंतप्रधान मोदींनी केली तेजसमधून सफर
पंतप्रधान मोदींनी केली तेजसमधून सफर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 3:14 PM IST

Updated : Nov 25, 2023, 4:09 PM IST

बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस विमानाची सफर केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, या अनुभवाने देशाच्या स्वदेशी क्षमतेबाबत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तसंच हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचं त्यांनी कौतुक केलं. तेजस या संपूर्ण स्वदेशी हलक्या लढावू विमानाच्या विकासातील या संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्याबद्दल त्यांनी या संस्थांचं अभिनंदन केलं.

  • Successfully completed a sortie on the Tejas. The experience was incredibly enriching, significantly bolstering my confidence in our country's indigenous capabilities, and leaving me with a renewed sense of pride and optimism about our national potential. pic.twitter.com/4aO6Wf9XYO

    — Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता, आमच्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता, आणि मला आमच्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना देऊन गेली. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

एचएएलचे हार्दिक अभिनंदन - यावेळी पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात की, आज तेजसमध्ये उड्डाण करताना, मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की आमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे, आम्ही स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय वायुसेना, डीआरडीओ आणि एचएएलचे हार्दिक अभिनंदन. मोदी यांनी या तेजस सफरीबाबत काही फोटोही ट्विटरवर पोस्ट केले आहेत. पीएमओच्या हँडलवरही त्यांचे काही फोटो त्यांनी टाकले आहेत. उड्डाणापूर्वीची तयारी विमानात बसलेले हे फोटो आहेत.

  • मैं आज तेजस में उड़ान भरते हुए अत्यंत गर्व के साथ कह सकता हूं कि हमारी मेहनत और लगन के कारण हम आत्मनिर्भरता के क्षेत्र में विश्व में किसी से कम नहीं हैं। भारतीय वायुसेना, DRDO और HAL के साथ ही समस्त भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं। pic.twitter.com/xWJc2QVlWV

तेजसमधून सफर - पंतप्रधान मोदी आज संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी इथे आले होते. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्समधील उत्पादन सुविधांवर चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी तेजसमधून सफर केली. या माध्यमातून भारतातील संरक्षण उत्पादने आणि त्यांची निर्यात कशी वाढवली पाहिजे यावर प्रकाश टाकला.

HAL सोबत करार - तेजस हे हलके लढाऊ विमान खरेदी करण्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे. यूएस संरक्षण कंपनी GE एरोस्पेसने पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या यूएस दौऱ्यात Mk-II-तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी HAL सोबत करार केला होता.

उल्लेखनीय कामगिरी - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या वर्षी एप्रिलमध्ये सांगितलं होतं की, भारताची संरक्षण निर्यात 2022-2023 मध्ये 15,920 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. देशासाठी ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा..

  1. मिशन आत्मनिर्भर! तेजस लढाऊ विमानांसह लष्करी सामुग्रीच्या निर्यातीस मंजुरी
  2. अनेक राष्ट्रांनी व्यक्त केली 'तेजस' खरेदीची इच्छा; 'एचएएल' अध्यक्षांची माहिती
  3. हवाई दलाची ताकद वाढणार; ८३ 'तेजस' लढाऊ विमानांच्या खरेदीस मंजूरी

Last Updated : Nov 25, 2023, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.