ETV Bharat / bharat

Rahul Gandhi on Narendra Modi : काँग्रेस पक्षाच्या सत्य बोलण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले - राहुल गांधी

author img

By

Published : Feb 9, 2022, 9:59 AM IST

Updated : Feb 9, 2022, 12:55 PM IST

पक्षाने सत्य परिस्थिती मांडली. या सत्याला पंतप्रधान घबरतात. ते सत्याला उत्तर देऊ शकत नाहीत. त्यांचा मार्केटिंगचा व्यवसाय आहे. (Rahul Gandhi on Narendra Modi) त्यामुळे सत्य आणि सत्य परिस्थितीला पंतप्रधान समोर जाऊ शकत नाहीत असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत, राज्यसभेत काँग्रेसवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना पत्रकारांसमोर बोलत होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी V पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई - काँग्रेस पक्ष सत्य बोलत आहे. त्यामुळे पंतप्रधान काँग्रेसला घाबरत आहेत. त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांचा पूर्ण व्यवसाय मार्केटिंगचा आहे. त्यांच्यातील भीती आजच्या भाषणातून दिसली. राज्यसभेतील संपूर्ण भाषण काँग्रेसवर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावरच होते. (Narendra Modi In Rajya Sabha) काँग्रेसने काय केले नाही, हे मोदींनी सांगितले. (Prime Minister Narendra Modi fears Congress party) परंतु, भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यावर ते काही बोलले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यावर राहुल गांधी पत्रकारांसमोर बोलत होते.

राहुल गांधी यांचे जोरदार उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला होता. (Discussion On President Address In Lok Sabha) नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वरील जोरदार उत्तर दिले आहे.

पंतप्रधानांच्या दिवाळखोर परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एक झाले

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली. (Political parties Immaturity In The Last 2 Years) त्यांच्याबद्दल कोणी प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. गांधी कुटंबातील अनेकांनी देशासाठी योगदान दिले आहे. मी बोललेल्या तीन गोष्टींवर नरेंद्र मोदी यांनी काही उत्तर दिले नाही. (Prime Minister Narendra Modi) 'दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत, त्यापैकी एक गरीब लोकांसाठी आहे आणि दुसरा काही श्रीमंत लोकांसाठी आहे. त्याबरोबरच आमच्या सर्व संस्था एकापाठोपाठ एक काबीज केल्या जात आहेत. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. (Rahul Gandhi will speak on the budget 2022) तिसरी गोष्ट अशी की, पंतप्रधानांच्या दिवाळखोर परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एक झाले आहेत, ही देशासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. (Prime Minister Narendra Modi targeted Congress in Lok Sabha) या तीनही गोष्टींवर ते काहीही बोलले नाहीत असही गांधी म्हणाले आहेत.

राज्यसभेच्या व्यासपीठाचा वापर प्रचारासाठी केला

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी, चिनी आक्रमकता, परराष्ट्र धोरणातील त्रुटी, सरकारच्या संघीय व्यवस्थेबाबतचे मुद्दे उपस्थित केले होते. यावरून लक्ष वळवण्यासाठी एकसंध राष्ट्राच्या कल्पनेने पंतप्रधानांनी काँग्रेसवर आरोप केले. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत म्हणून त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या व्यासपीठाचा वापर प्रचारासाठी केला. कारण त्यांनी केवळ राजकीय भाषण केले आहे.

मोदीजींनी सर्वांना कोरोना पसरवण्यासाठी पाठवले असे म्हणायचे का?

मंगळवारी, पंतप्रधान मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत असताना, काँग्रेस खासदारांनी निषेध म्हणून सभात्याग केला. स्थलांतरित कामगारांना तिकिटे देऊन कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांवर प्रत्युत्तर देताना, खर्गे यांनी सरकारच्या लेखी उत्तराचा हवाला दिला, ज्यात गुजरातने सर्वाधिक श्रमिक विशेष गाड्या पाठवल्याचा उल्लेख केला आहे. "आता, मोदीजींनी सर्वांना कोरोना पसरवण्यासाठी पाठवले असे म्हणायचे का? त्यांनी अचानक देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आणि आता केवळ स्वतःचे अपयश लपवण्यासाठी ते काँग्रेस पक्षाला दोष देत आहेत, असही खरगे म्हणाले आहेत.

काँग्रेसवर हल्ला करण्यातच २ तास घालवले

याचवेळी लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते, गौरव गोगोई यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटले आहे की, "दोन प्रकारची भाषणे आहेत, एक राहुल गांधी महागाई, बेरोजगारी, चीनचा धोका, चुकीच्या धोरणांमुळे संपत्तीचे केंद्रीकरण यावर बोलले. पंतप्रधान या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देतील असे वाटले होते. परंतु, त्यांनी काँग्रेसवर हल्ला करण्यातच २ तास घालवले असा टोला गोगोई यांनी लगावला आहे.

हेही वाचा - पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसून धाधांत खोटे बोलणारे नरेंद्र मोदी हे देशातील व जगातील पाहिले पंतप्रधान - भाई जगताप

Last Updated : Feb 9, 2022, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.