पॅरिस - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर सहमती दर्शवली.
-
Delighted, as always, to meet my friend President @EmmanuelMacron. We talked at length about bilateral as well as global issues. India and France are proud developmental partners with our partnership spread across different sectors. pic.twitter.com/5Kjqcjf0tQ
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delighted, as always, to meet my friend President @EmmanuelMacron. We talked at length about bilateral as well as global issues. India and France are proud developmental partners with our partnership spread across different sectors. pic.twitter.com/5Kjqcjf0tQ
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2022Delighted, as always, to meet my friend President @EmmanuelMacron. We talked at length about bilateral as well as global issues. India and France are proud developmental partners with our partnership spread across different sectors. pic.twitter.com/5Kjqcjf0tQ
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2022
माझे मित्र राष्ट्रपती यांना भेटून नेहमीप्रमाणेच आनंद झाला. आम्ही द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. भारत आणि फ्रान्स हे अभिमानास्पद विकास भागीदार आहेत (French President Emmanuel Macron) आणि आमच्या भागीदारी विविध क्षेत्रात पसरल्या आहेत," पंतप्रधान मोदींनी इंग्रजी आणि फ्रेंच भाषांमध्ये ट्विट केले. सोबत त्यांचा आणि मॅक्रॉनचा एकमेकांना मिठी मारतानाचा फोटो.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही ट्विट करून या भेटीची माहिती दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात महत्वाची चर्चा झाली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. भारत-फ्रान्स भागीदारी ही शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी एक शक्ती आहे, असाही संदेश यावेळी देण्यात आला.
तत्पूर्वी, पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, दोन्ही नेत्यांमधील भेटीमुळे भारत-फ्रान्स मैत्रीला गती मिळेल. मॅक्रॉन यांनी एलिसी पॅलेस येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदींशी भेट घेतली.
-
#WATCH Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from French President Emmanuel Macron at Elysee Palace in Paris
— ANI (@ANI) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: DD) pic.twitter.com/D5PxknMfsK
">#WATCH Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from French President Emmanuel Macron at Elysee Palace in Paris
— ANI (@ANI) May 4, 2022
(Source: DD) pic.twitter.com/D5PxknMfsK#WATCH Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from French President Emmanuel Macron at Elysee Palace in Paris
— ANI (@ANI) May 4, 2022
(Source: DD) pic.twitter.com/D5PxknMfsK
दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील शत्रुत्व कसे थांबवायचे आणि या संघर्षाचे जागतिक आर्थिक परिणाम कसे कमी करता येतील यावर चर्चा केली असण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी मॅक्रॉन यांनी त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली आणि मॉस्कोला त्यांच्या जबाबदारीच्या पातळीवर जाण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - रक्षक झाला भक्षक! बलात्कार केल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या मुलीवर पोलिसाकडून बलात्कार