ETV Bharat / bharat

Karnataka Assembly Elections: कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी! पंतप्रधानांचा अन् प्रियंका गांधींचा रोड शो

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूमध्ये मेगा रोड शो केला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर जमा झाले. त्याचवेळी लोकांनी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी केली. यादरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी यांनीही रोड शो केला. त्यालाही लाखोंच्या सख्येने लोक उपस्थित होते.

Karnataka Assembly Elections
पंतप्रधानांचा अन् प्रियंका गांधींचा रोड शो
author img

By

Published : Apr 29, 2023, 10:46 PM IST

पंतप्रधानांचा रोड शो

धारवाड (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार कर्नाटकच्या उत्तर बेंगळुरू भागात एक रोड शो केला, जिथे प्रचंड गर्दी दिसून आली. राज्यातील तिसर्‍या जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर मोदींचे बेळगावी जिल्ह्यातील कुडाची येथून सायंकाळी पाचच्या सुमारास येथे आगमन झाले. त्यांनी खास डिझाइन केलेल्या वाहनातून रोड शोम केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवी टोपी परिधान केली होती. मोदींसोबत बेंगळुरू उत्तरचे खासदार डी.व्ही. सदानंद गौडा आणि भाजपचे विधान परिषद सदस्य सी. नारायणस्वामीही उपस्थित होते.

प्रियंका गांधींचा रोड शो

कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी मतदान : मोदी आज सकाळी दिल्लीहून बिदरला पोहोचले. बीदरमधील हुमनाबाद, विजयपुरा शहर आणि बेळगावी जिल्ह्यातील कुडाची येथे त्यांनी जाहीर सभांना संबोधित केले. पंतप्रधान शनिवारी बेंगळुरूमध्ये रात्रीचा मुक्काम घेतील आणि रविवारी सकाळी कोलार शहर, रामनगर जिल्ह्यातील चन्नापटना आणि हसन जिल्ह्यातील बेलूर येथे जाहीर सभा घेण्यासाठी रवाना होणार आहेत. दिल्लीला परतण्यापूर्वी मोदी रविवारी म्हैसूरमध्ये रोड शोही करणार आहेत. कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.

'कर्नाटकच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्षाला मतदान करा : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही आज कुंडागोला येथे रोड शो केला आहे. काँग्रेस उमेदवार कुसुमावती शिवल्ली यांचा प्रचार केला. हेलिकॉप्टरने कुंडागोला येथे पोहोचल्यानंतर प्रियंका गांधी थेट हेलिपॅडवरून आसपासच्या मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांकडे गेल्या. त्यांना त्यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर त्यांनी प्रचाराच्या वाहनात बसून हुबळी-लक्ष्मीेश्वर राज्य महामार्गावरील जेएसएस विद्यापीठापासून रोड शोला सुरुवात केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. रोड शोमध्ये हजारो काँग्रेस कार्यकर्ते आणि लोककला मंडळ सहभागी झाले होते. रोड शो दरम्यान, मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रियंका यांनी 'कर्नाटकच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्षाला मतदान करा असे आवाहन केले.

हेही वाचा : Story of Padala Rupadevi : रामोजी राव आले धावून! दिव्यांग बॅडमिंटनपटूला केली 3 लाखांची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.