ETV Bharat / bharat

Teacher Throw Student : धक्कादायक! शिक्षिकेने विद्यार्थीनीला चक्क पहिल्या मजल्यावरून खाली फेकले! - पहिल्या मजल्यावरून खाली फेकले

दिल्लीतील प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यीनीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची (teacher throws class 5 student from first floor) घटना घडली आहे. (primary school teacher throws class 5 student). घटनेची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी शाळेत एकच गोंधळ घातला. पोलिसांनी आरोपी शिक्षिका गीता देशवाल हिला ताब्यात घेतले आहे. (teacher throw student from first floor)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 16, 2022, 5:41 PM IST

Updated : Dec 16, 2022, 7:02 PM IST

नातेवाईकांनी शाळेत गोंधळ घातला

नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बाग भागातील फिल्मिस्तान येथे एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थ्यीनीला बाल्कनीतून खाली फेकले. (teacher throws class 5 student from first floor). ही घटना मॉडेल बस्ती येथील महापालिकेच्या कन्या शाळेत घडली आहे. (primary school teacher throws class 5 student). जखमी मुलीवर हिंदूराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वंदना असे या मुलीचे नाव असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मात्र शिक्षिकेने असे का केले हे अजून समजू शकलेले नाही. (teacher throw student from first floor).

पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेतले : दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.15 च्या सुमारास पीएस डीबीजी रोडच्या बीट ऑफिसरला एका व्यक्तीने या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी मुलीचे नातेवाईक शाळेबाहेर गोंधळ घालत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिका गीता देशवाल हिला ताब्यात घेतले आहे. गीता देशवालने प्रथम वंदनाचा पेपर कापण्याच्या कात्रीने जखमी केले आणि नंतर तिला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

यापूर्वीही शिक्षकांनी अनेक मुलांना मारले : या संपूर्ण प्रकरणावर विद्यार्थ्यीनीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, या शाळेत काही शिक्षण होत नाही. यापूर्वीही शिक्षकांनी अनेक मुलांना मारले आहे. याबाबत तक्रारही करण्यात आली आहे, मात्र सुनावणी होत नाही. गदारोळ करणाऱ्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, या मुलीशिवाय इतर विद्यार्थ्यांना देखील शाळेतील शिक्षकांनी मारले आहे. प्रत्येक वेळी आम्हाला वाटायचे की कदाचित मुलांचीच चूक असेल, मात्र आज शिक्षिकेने मर्यादा ओलांडली आहे.

सरकारने शाळेची चौकशी करावी : नातेवाईक म्हणाले, "एका लहान मुलीला पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली फेकण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांवर कात्रीने हल्ला करण्यात आला. अशा शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. या शाळेच्या आत काय चालले आहे याची चौकशी सरकारने करावी?". सध्या आरोपी महिला शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्व कोनातून तपास सुरू आहे.

शिक्षिकेला निलंबित केले : दिल्ली महानगरपालिकेने शुक्रवारी या शिक्षिकेला तात्काल प्रभावाने निलंबित केले आहे. एमसीडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विभागाकडून पुढील तपास केला जात आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त श्वेता चौहान म्हणाल्या, "16 डिसेंबर रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास एका स्थानिकाने मुलीला फेकल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच बडा हिंदूराव पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांना माहिती मिळाली की, प्राथमिक शाळेच्या पाचवीच्या वर्गातील मॉडेल बस्ती शाळेच्या शिक्षिका गीता देशवाल यांनी वंदना या विद्यार्थिनीवर प्रथम लहान कात्रीने वार केले आणि नंतर तिला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खुनाच्या प्रयत्नाचे कलम दाखल करून तपास सुरू आहे.".

Last Updated : Dec 16, 2022, 7:02 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.