डेहराडून - दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत ( CDS General Bipin Rawat ) यांना पद्म विभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका व तारिणी यांच्याकडे बिपिन रावत यांचे पुरस्कार सुपूर्द केले. जनरल रावत यांचे गतवर्षी हेलीकॉप्टर क्रॅशमध्ये निधन झाले होते. त्याचबरोबर पुण्यातील सीरम इन्सिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने ( Cyrus Poonawalla ) सन्मानित करण्यात आले.
-
#WATCH Swami Sivananda receives Padma Shri award from President Ram Nath Kovind, for his contribution in the field of Yoga. pic.twitter.com/fMcClzmNye
— ANI (@ANI) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Swami Sivananda receives Padma Shri award from President Ram Nath Kovind, for his contribution in the field of Yoga. pic.twitter.com/fMcClzmNye
— ANI (@ANI) March 21, 2022#WATCH Swami Sivananda receives Padma Shri award from President Ram Nath Kovind, for his contribution in the field of Yoga. pic.twitter.com/fMcClzmNye
— ANI (@ANI) March 21, 2022
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. त्यामध्ये चौघांना पद्म विभूषण, 17 पद्म भूषण व 107 जणांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. पद्म विभूषण भारत सरकारकडून देण्यात येणारे दुसरे सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. जनरल बिपिन रावत यांना 31 डिसेंबर, 2019 रोजी देशाचे पहिले सीडीएस म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
यांचा झाला सन्मान
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पैरालंपिक रौप्य पदक विजेते देवेंद्र झाझरिया यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एसआयआयचे व्यवस्थापकीय संचालक साइरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- गुरमीत बावा (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मुलीने पुरस्कार स्वीकारले.
- भारतीय निर्देशक चंद्रप्रकाश द्विवेदी यांना चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे.
- राधे श्याम खेमका (मरणोत्तर) साहित्य व शिक्षा क्षेत्रातील पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून त्यांच्या मुलाने पुरस्कार स्वीकारले.
- साहित्य व शिक्षामधी उल्लेखनिय कामगिरीने सच्चिदानंद स्वामी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- हॉकी खेळाडू वंदना कटारिया यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पैरा-शूटर अवनी लेखरा यांना क्रीडा श्रेणीतील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Criticized : 'ते कधीपासून हिंदू झाले हे तपासावे लागेल; संजय राऊतांचा भाजप-मनसेवर निशाणा