ETV Bharat / bharat

Draupadi Murmu : आपल्या लहानपणीच्या शाळेला भेट देऊन राष्ट्रपती मुर्मू झाल्या भावूक

ट्विटरवर राष्ट्रपतींनी लिहिले, "आज मी भुवनेश्वरमधील माझ्या गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल आणि कुंतलकुमारी सबत आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. हा माझ्यासाठी एक नॉस्टॅल्जिक क्षण होता. या भेटीमुळे माझ्या विद्यार्थी जीवनातील अनेक गोड आठवणी परत आल्या." (Draupadi Murmu visited her childhood school).

Draupadi Murmu
Draupadi Murmu
author img

By

Published : Nov 11, 2022, 9:03 PM IST

Updated : Nov 11, 2022, 10:23 PM IST

भुवनेश्वर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी शुक्रवारी युनिट -2 कॅपिटल गर्ल्स हायस्कूल आणि कुंतलाकुमारी सबत आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. येथेच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. (Draupadi Murmu school). राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच आपल्या गृहराज्य ओडीशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. (Draupadi Murmu in Odisha).

द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शाळेला भेट दिली

हा दिवस अत्यंत नॉस्टॅल्जिक होता - शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी आणि त्यांच्या मैत्रिणींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हॉटेलच्या खोलीला भेट दिली, जिथे त्या त्यांच्या विद्यार्थीदशेत राहिल्या होत्या. 1970 च्या दशकात त्या ज्या पलंगावर झोपायच्या तो पलंग पाहून त्या भावूक झाल्या. तो पलंग आता दुरुस्त करून खोलीत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. व्हिजिटर्स डायरीमध्ये राष्ट्रपतींनी लिहिले की, हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत नॉस्टॅल्जिक होता. येथील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना त्या भावनांनी भारावून गेल्या होत्या. विद्यार्थ्यांना वसतिगृहात सुरक्षित आणि घरगुती वातावरण प्रदान केले जात आहे, हे पाहून मला आनंद झाला. मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते, असे त्या म्हणाल्या. ट्विटरवर राष्ट्रपतींनी लिहिले, "आज जेव्हा मी भुवनेश्वरमधील माझ्या अल्मा माटर गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल आणि कुंतलकुमारी सबत आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली तेव्हा तो एक नॉस्टॅल्जिक क्षण होता. या भेटीमुळे माझ्या विद्यार्थी जीवनातील अनेक गोड आठवणी परत आल्या."

1970 च्या दशकात त्या या पलंगावर झोपायच्या
1970 च्या दशकात त्या याच पलंगावर झोपायच्या

Last Updated : Nov 11, 2022, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.