ETV Bharat / bharat

New Parliament Building : राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती धनखर यांनी केले नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचे स्वागत - संसदेची नवी इमारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी त्याचे स्वागत केले आहे. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, ही संपूर्ण देशासाठी आनंदाची बाब आहे. तर, नवीन संसद भवन भारताच्या विकासाचे साक्षीदार असेल, असे धनखर म्हणाले.

Draupadi MURMU Jagdeep Dhankhar
द्रौपदी मुर्मू जगदीप धनखर
author img

By

Published : May 28, 2023, 8:39 PM IST

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचे स्वागत केले आहे. द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि अत्यंत आनंदाची बाब आहे.

'हा प्रसंग भारताच्या इतिहासात सुवर्ण शब्दात लिहिला जाईल' : उद्घाटनप्रसंगी आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, 'नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशाच्या इतिहासात सुवर्ण शब्दात लिहिले जाईल.' त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, 'नवीन संसद भवनाचे उद्घाटन ही भारतातील सर्व जनतेसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी राष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखवला. संसद देशासाठी मार्गदर्शक प्रकाश असल्याचे वर्णन करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, 'नवीन संसद भवन आपल्या लोकशाही प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.' मुर्मू म्हणाल्या की, 'नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा प्रसंग भारताच्या इतिहासात सुवर्ण शब्दात लिहिला जाईल.'

  • #WATCH | Rajya Sabha Deputy Chairman Harivansh reads out a message of Vice-President Jagdeep Dhankhar during the inauguration of new Parliament building pic.twitter.com/uWbkd9gDAg

    — ANI (@ANI) May 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'नवीन इमारतीतून भारताच्या प्रगतीची साक्ष मिळेल' : या प्रसंगी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, 'नवीन संसद भवन भारताच्या विकासाचे साक्षीदार होईल. नवीन संसद भवन राजकीय सहमती प्रस्थापित करण्यास मदत करेल. तसेच गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्याचे प्रतीक बनेल. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त आपल्या संदेशात त्यांनी भारतातील लोकांच्या आशा - आकांक्षांवर तोडगा निघेल, अशी आशाही व्यक्त केली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नवीन संसद भवनातील लोकसभेच्या कक्षेत आयोजित कार्यक्रमात धनखर यांचा संदेश वाचून दाखवला. नवीन इमारतीतून भारताच्या प्रगतीची साक्ष मिळेल, असे धनखर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी येथील नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले.

हेही वाचा :

  1. New Parliament : देवेगौडा, जगन मोहन यांना पहिल्या रांगेत स्थान; नव्या समीकरणांची नांदी?
  2. Sanjay Raut On Parliament Inauguration : 'हे लोकशाहीसाठी चांगले नाही', संजय राऊतांची टीका
  3. New Parliament Building : नवीन संसद भवन उद्घाटन सोहळा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.