ETV Bharat / bharat

आंध्रचे एन. व्ही. रमन्ना नवे सरन्यायाधीश! आईवडील शेतकरी, कुटुंबातील पहिलेच वकील

President appoints Justice NV Ramana as the next Chief Justice of India
एन. व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश!
author img

By

Published : Apr 6, 2021, 11:03 AM IST

Updated : Apr 13, 2021, 8:49 AM IST

11:00 April 06

एन. व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश!

नवी दिल्ली : न्यायमूर्ती एन.व्ही. रमन्ना यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंबंधी राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयातून नोटीस जारी करण्यात आली आहे. २४ एप्रिलला रमन्ना आपल्या पदाची शपथ घेतील. ते देशाचे ४८वे सरन्यायाधीश असणार आहेत.

कुटुंबातील पहिलेच वकील..

नथालपती वेंकट रमन्ना यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ला आंध्र प्रदेशच्या पोन्नवरम गावात झाला होता. त्यांचे आई-वडील शेती करत. त्यांनी विज्ञान आणि विधी विषयांमध्ये पदवी घेतली आहे. आपल्या कुटुंबातील ते पहिलेच वकील आहेत.

विविध विषयांमध्ये अनुभव..

१० फेब्रुवारी १९८३ला त्यांना वकिलीची मानद मिळाली. यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरण, आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम केले. भारतीय रेल्वे आणि अशाच विविध सरकारी संघटनांसाठी ते पॅनल वकील राहिले आहेत. तसेच, त्यांनी आंध्र प्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही कामकाज पाहिले आहे. नागरी आणि गुन्हेगारी पक्षामध्ये त्यांना विशेषता प्राप्त आहे, तसेच संविधान, कामगार, सेवा, आंरराज्यीय नदी-विवाद आणि निवडणुकांसंबंधी खटल्यांचा त्यांना अनुभव आहे.

२७ जून २०००ला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ यादरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. २ ऑक्टोबर २०१३ला त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमण्यात आले. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०१४ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

विविध देशांच्या न्यायव्यवस्थांचा अभ्यास..

पुढे युनायटेड किंगडमने त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी ग्रेट ब्रिटनचा दौराही केला. यावेळी त्यांनी ब्रिटनमधील न्यायव्यवस्थेचा अभ्यास केला. तसेच, अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचाही दौरा केला आहे. १८ जून २०१९ला रशियामध्ये झालेल्या शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्या देशांसाठी आयोजित मुख्य न्यायाधिशांच्या परिषदेलाही ते उपस्थित होते.

हेही वाचा : 100 कोटी वसुली प्रकरण, सीबीआयचे पथक येणार मुंबईत

Last Updated : Apr 13, 2021, 8:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.