ETV Bharat / bharat

Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीत 'AIMIM' अन् 'आप'ची एन्ट्री भाजपसाठी फायद्याचीच! - गुजरातमध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघात

ओवेसींचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन हा पक्ष भाजपची बी टीम आहे आणि त्यांनी दिलेले उमेदवार भाजपलाच अधिक फायदेशीर आहेत, अशी चर्चा काही काळापासून सुरू आहे. ETV भारत नेटवर्कचे संपादक बिलाल भट लिहितात, एआयएमआयएमच्या उमेदवारांमुळे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Gujrat Election 2022इ
Gujrat Election 2022
author img

By

Published : Nov 25, 2022, 9:22 PM IST

Updated : Nov 26, 2022, 8:58 AM IST

हैदराबाद : गुजरातमध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढल्याने यंदाची निवडणूक अधिकच रंजक होते आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्ष मुस्लिम भावनांचे प्रतिनिधित्व करतो असा दावा पक्षप्रमुख ओवैसी यांच्याकडून सातत्याने केला जातो. गुजरातमधील आपल्या पहिल्या लढतीत असदुद्दीन ओवैसी यांनी 14 उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यापैकी 12 उमेदवार मुस्लिम बहुसंख्य मतदारसंघात उभे करून त्यांनी सर्व गैर भाजप पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. अशाप्रकारे त्यांनी भाजप साठी ही निवडणूक सोपी केली आहे!

मुस्लिम मतांत फूट पडू शकते : भाजपचा राज्यात एक निष्ठावान मतदार आहे. त्यांच्यावर इतर पक्षांना प्रभाव पाडणे कठीण आहे. या विपरीत कॉंग्रेसला राज्यातील सर्व गैर-भाजप मतदारांचा आधार आहे तर आम आदमी पक्ष कल्याणकारी राज्याच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. गुजरातमधील मुस्लिम, ज्यांना भाजपविरोधी मानले जाते, त्यांनी नेहमीच काँग्रेसला मतदान केले आहे. कॉंग्रेसला त्यांनी नेहमीच उजव्या पक्षाचा पर्याय म्हणून पाहिले आहे. परंतु ह्या निवडणुकीत त्यांच्यासाठी भरपूर विस्तृत पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे यावेळी मुस्लिम मतांत मोठी फूट पडू शकते.

AIMIM मुळे मुस्लिम मतांत फुट : बिहारच्या गोपालगंज जागेवर नुकतीच पार पडलेली पोटनिवडणूक, AIMIM विरोधी पक्षांचे नशीब कसे बदलू शकते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. निवडणुकीत भाजप आणि आरजेडी यांच्यात 1,794 मतांचा फरक होता तर एआयएमआयएमला 12,214 मते मिळाली होती. अशाप्रकारे एमआयएम मुळे आरजेडीची मते कमी झाली. ओवैसी यांनी अब्दुस सलाम यांना उमेदवारी दिली नसती तर आरजेडीने गोपालगंजची जागा सुमारे 10,000 मतांनी जिंकली असती. अहमदाबादची जागा बिहारच्या गोपालगंज पेक्षा कोणत्याही प्रकारे वेगळी नाही. परिणामी, एआयएमआयएम, काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांचे मतं फोडण्याची शक्यता आहे.

एकाच समाजातील दोन उमेदवार : जमालपूर-खाडिया येथे छिपा मुस्लिमांची (रंग आणि छपाईमध्ये गुंतलेला समुदाय) संख्या महत्वाची असल्याने यावेळी काँग्रेसचे इम्रान खेडावाला आणि AIMIM चे साबीर काबलीवाला हे एकाच समाजातील दोन उमेदवार येथून निवडणूक लढवत आहेत. इम्रान हे जमालपूर-खाडियाचे विद्यमान आमदार आहेत, तर साबीर हे ओवैसींच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. छिपा समाजात ठराविक उमेदवाराला एकमताने मत देण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. तथापि, यावेळी, दोन्ही उमेदवार छिपा समाजाचे असल्याने, मतदारांनामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

ओवैसी भाजपची बी टीम? : ओवैसी ही भाजपची बी टीम आहे आणि त्यांनी दिलेले उमेदवार भाजपलाच अधिक फायदेशीर ठरतात, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. एआयएमआयएमचे नेते ओवैसी यांच्या प्रतिष्ठेवरही बिहारमधील पोटनिवडणुकीनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही जागा एआयएमआयएमच्या उमेदवाराने मतांची विभागणी केल्यामुळे भाजपकडे गेली होती. त्यामुळे गुजरातमध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार करत असताना एका वर्गाने ओवैसींचा निषेध केला आहे. त्यांनी ओवैसीविरोधी घोषणा देताना त्यांना "भाजप आणि आरएसएस" एजंट असे म्हटले आहे.

ओवैसींचे डॅमेज कंट्रोल : ओवैसी यांनी अहमदाबादच्या बापूनगर जागेवरील आपले उमेदवार शहानवाज पठाण यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. बापूनगरची जागा काँग्रेसचे उमेदवार हिम्मत सिंह यांना सोडून ओवैसींनी डॅमेज कंट्रोल केले का हे पाहायचे आहे. या जागेवर 16 टक्के मुस्लिम मते आहेत. एआयएमआयएमने शर्यतीतून उमेदवारी मागे घेतली असली तरी बापूनगर जागेवरील 29 पैकी 10 उमेदवार मुस्लिम आहेत. 27 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या लिंबायत मतदारसंघात 44 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 36 मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.

ओवैसींचे मुस्लिम आणि दलित मतांवर लक्ष : ओवेसी यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अहमदाबादच्या दानिलिमडा येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार शैलेश परमार यांच्या विरोधात अनुसूचित जातीचाच उमेदवार उभा केला आहे. यावरून ओवैसींचे लक्ष मुस्लिम आणि दलित या दोघांवर असल्याचे दिसून येते. दानिलिमडा सीटवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसह मुस्लिम लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात आहे. येथील एकूण 2,39,999 मतदारांपेकी 65,760 मतदार मुस्लिम आहेत. अशाप्रकारे विधानसभा क्षेत्रात त्यांचा आकडा 27 टक्के इतका आहे.

ओवैसींमुळे भाजपचा अप्रत्यक्षरित्या फायदा : गुजरातमध्ये सुमारे 11% मतदार मुस्लिम आहेत. राज्याच्या सुमारे 25 विधानसभा जागांवर मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. एआयएमआयएम अशा जागांवर लक्ष केंद्रित करत आहे जिथे मुस्लिम आणि दलित संख्या लक्षणीय आहे. यातील बहुतेक जागा ह्या निर्णायक आहेत. ओवैसींनी वडगाम जागेवर काँग्रेसचे आमदार आणि प्रसिद्ध कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी यांच्या विरोधात दुसरा अनुसूचित जातीचा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे एकेकाळी भाजपला जिंकण्यासाठी अशक्य असलेली ही जागा आता सहज जिंकता येणार असल्याचे स्पष्ट होते आहे. मेवाणी यांनी 2017 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेस आणि आप रिंगणात उतरले नव्हते. वडगाम जे एससीसाठी राखीव आहे तेथे सुमारे 25 टक्के मुस्लिम मतदार आहेत.

काँग्रेसने सौराष्ट्रात मानली हार : राज्यात भाजप सर्व 182 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेसने 179 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. 2017 च्या निवडणुकीत, 11 जिल्हे असलेल्या सौराष्ट्रात भाजपने केवळ 18 जागा जिंकल्या होत्या. ऐतिहासिकदृष्ट्या हा प्रदेश काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत, सौराष्ट्र आणि कच्छमधील काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला राज्यभरात 49% मते मिळाली. त्यापाठोपाठ कॉंग्रेसला 41% मते मिळाली तर उर्वरित मते 'इतरांनी' मिळवली होती. मात्र, यावेळी काँग्रेसची पारंपारिक मते 'आप' आणि 'एआयएमआयएम' मुळे फुटून भाजपचा लाभ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रचारातून त्यांनी सौराष्ट्रात निवडणूकीपूर्वीच हार मानल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे आक्रमकपणे प्रचार करत आहेत.

Last Updated : Nov 26, 2022, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.