पणजी- पर्ये मतदारसंघतील ( Parye Goa Assembly election 2022 ) उमेदवारीवरून राणे पिता-पुत्रांच्या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाने प्रतापसिंह राणे यांना तिकीट दिल्याने हा वाद अधिक पेटण्याची ( Pratapsingh Rane Vs Vishvjit Rane ) शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि पर्यें मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी वयाची 83 व राजकीय जीवनाची 50 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. मात्र वयोमानानुसार त्यांचा मतदारसंघातील वावर कमी झाला आहे. त्यांचा राजकीय वारसा आणि मतदारसंघतील कार्य त्यांचे पुत्र आणि भाजपचे मंत्री विश्वजित राणे पाहतात. प्रतापसिंह राणे यांना आता राजकारण जमणार नाही. त्यांनी निवृत्ती घ्यावी, अशी इच्छा विश्वजित यांनी व्यक्त केली होती. अन्यथा आपण त्यांच्याविरोधात भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याचे विश्वजित ( Vishvjit Rane on fathers work in politics ) यांनी सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या दोघा पिता-पुत्रांचा भाजपा विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगला आहे.
हेही वाचा-PM Modi in Goa LIVE UPDATE : गोवा मुक्ती दिन सोहळा.. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक विकास योजनांचे लोकार्पण
काँग्रेसची कुरघोडी, राणेंना उमेदवारी जाहीर
राणे कुटुंबाच्या कौटुंबिक वादात काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. प्रतापसिंह राणे यांनी पर्येंतून निवडणूक लढवून पुत्र विश्वजित राणे पर्यायाने भाजपला आव्हान द्यावे, म्हणून अचानकपणे त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तसे पत्र गोवा काँग्रेस कमिटीला पाठवून त्यांची ( congress ticket to Pratapsingh Rane ) उमेदवारी निश्चित केली आहे.
हेही वाचा-कन्नड समर्थक संघटनांनी 31 डिसेंबर रोजी पुकारला बंद ; महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी
काँग्रेसला उमेदवार सांभाळणे मोठे आव्हान
सध्या काँग्रेसला पक्षाने जाहीर केलेले उमेदवार सांभाळणे हे मोठे आव्हान आहे. नुकतेच काँग्रेसने आपल्या पहिल्या 8 उमेदवारांची यादी घोषित केली होती. मात्र, यातील अलेक्स रेजिनाल्ड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अन्य उमेदवारही इतर पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राणे यांची उमेदवारी घोषित करून ते किती काळ पक्षात थांबणार यावरही सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.