ETV Bharat / bharat

Goa Assembly Election : गोव्यात राणे पिता पुत्रांचा राजकीय संघर्ष पेटला - विश्वजित राणे आणि प्रतापसिंह राणे आमने सामने

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे ( Former Chief Minister Pratap Singh Rane ) आणि त्यांचे पुत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे ( Health Minister Vishwajit Rane ) यांच्या निवडणुकीवरुन राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. विश्वजित राणे आपल्या वडिलांविरुद्ध निवडणूक लढविणार आहे.

विश्वजित राणे
विश्वजित राणे
author img

By

Published : Dec 22, 2021, 6:00 PM IST

गोवा - आरोग्यमंत्री विश्वजित राणे ( Health Minister Vishwajit Rane ) विरुद्ध माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे ( Former Chief Minister Pratap Singh Rane ) असा पिता पुत्रांचा संघर्ष पेटला आहे. आपल्या वडिलांविरुद्ध विश्वजित यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. प्रतापसिंह राणे यांनी आपल्या वयाची 83 वर्षे व राजकीय कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, अशी विश्वजित यांची इच्छा आहे. मात्र त्यांनी तसा निर्णय न घेतल्यास आपण त्यांच्या विरोधात पर्यें मतदारसंघातून निवडणूक लढविणार ( Poriem Constituency ) असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रतापसिंह राणे यांचे वय झाले तरी देखील त्यांनी निवडणूक लढवावी, असे स्थानिक व केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रतापसिंह राणे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यातच काँग्रेसची राज्यात झालेली पडझड व बालेकिल्ला राखण्यासाठी काँग्रेसला सध्या फारच मोठी धडपड करावी लागत आहे. त्यातच नुकताच माजी मुख्यमंत्री रवी नाईक, लुईझींनो फलेरो, आलेक्स रेजिनाल्ड या बड्या नेत्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस नेतृत्व दिल्लीला रवाना

राज्यात काँग्रेसची पडझड सुरू झाली आहे. 17 वरून काँग्रेसचे फक्त दोनच आमदार शिल्लक आहेत. म्हणून डॅमेज कॅट्रोल रोखण्यासाठी केंद्रीय निरीक्षक पी. चिदंबरम आणि दिनेश गुंडूराव काल दिल्लीत दाखल झाले. ते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहेत.

हेही वाचा - Maharashtra Assembly Winter Session 2021 : अन् भास्कर जाधवांनी केली पंतप्रधानाची नक्कल, पाहा पुढे काय घडलं...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.