ETV Bharat / bharat

'बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही'; भाजपचं ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर दुसर्‍याच दिवशी भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत एक पोस्टर जारी केले. भाजपाने पक्षातील नऊ महिला नेत्यांची छायाचित्रे असलेले एक पोस्टर जारी केले आहे. बंगालला आपली आत्या नाही, तर मुलगी हवी आहे, असे त्यावर लिहलेले आहे.

मोदी-ममता
मोदी-ममता
author img

By

Published : Feb 27, 2021, 9:06 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर दुसर्‍याच दिवशी भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत एक पोस्टर जारी केले. भाजपाने पक्षातील नऊ महिला नेत्यांची छायाचित्रे असलेले एक पोस्टर जारी केले आहे. बंगालला आपली आत्या नाही, तर मुलगी हवी आहे, असे त्यावर लिहलेले आहे.

poster-war-between-tmc-and-bjp-in-west-bengal-assembly-elections
भाजपाचे पोस्टर...

तृणमूल काँग्रेसने भाजपावर टीका करत 'बंगाल को अपनी बेटी चाहिए', अशी घोषणा दिली होती. त्यावर भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं बंगाल भाजपमधील नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. गालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात त्यांन दीदींवर टीका केली. भाजपनं पोस्टरमध्ये ममता यांना आत्या म्हटलं आहे.

दीदींवरील आरोप -

भाजपा सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जींवर 'दीदी-भतीजा’ मुद्द्यावरून लक्ष्य करत आली आहे. अमित शाह यांच्यासह भाजप नेते बॅनर्जींवर सातत्याने वंशवादाच्या राजकारणाचा आरोप करतात. मोदी सरकार "लोककल्याणासाठी" काम करते. तर ममता बॅनर्जी जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करतात, असे शाह एका सभेत म्हणाले होते. ममता टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या आत्या आहेत.

भाजपाच्या पोस्टरवर तृणमूलची प्रतिक्रिया -

टीएमसीनेही भाजपच्या पोस्टरवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जारी केलेल्या पोस्टरमधील कोणती मुलगी बंगालची मुख्यमंत्री होईल, हे भाजपाने सांगावे, असा खोचक सवाल तृणमूलने केला आहे.

दीदींचे भाजपाला खुले आव्हान -

गृहमंत्री आमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर 'दीदी-भतीजा’ मुद्द्यावरून निशाणा साधला होता. यावर ममता बॅनर्जीं यांनींही पलटवार करत शाह यांना आव्हान दिलं होते. अभिषेक बॅनर्जी हे जनतेचे निवडलेले प्रतिनिधी आहेत. त्यामुळे अमित शाह यांनी सर्वप्रथम अभिषेक बॅनर्जीविरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि मग माझा सामना करावा, असे खुले आव्हान ममता यांनी दिले होते.

भाजपा-तृणमूलमध्ये अटीतटीचा सामना -

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. यावेळी पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपनं आपली संपूर्ण ताकद लावली आहे. निवडणुकांआधीच तृणमूलचे अनेक मोठे नेते भाजपात आल्यानं ममता बॅनर्जींना भाजपसोबत चुरशीची लढत लढावी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा चेहरा कोण असणार, हे अद्याप भाजपाने जारी केले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.