नागपूर : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय मोदी शाह घेतील असं सांगितल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभार मानले.
बावनकुळेंनी केलं शिंदेंचं कौतुक : विरोधीपक्षांकडून महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद असल्याचं म्हटलं होतं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलंय. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून चांगलं काम केल्याचं आम्ही पाहिलं, या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंचं कौतुक केलंय.
14 कोटी जनतेसाठी शिंदेंची भूमिका : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "महायुतीचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली ती खूप मोठी आहे. शिंदे यांची भूमिका महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसाठी मोठी आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंची भूमिका महत्त्वाची आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी काम केलं. तसंच महायुतीला भक्कम करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं."
मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय केव्हा? : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र नेतृत्त्व अमित शाह मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मोदी आणि शाह हे निर्णय घेतील त्याला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. म्हणून भाजपाकडून बावनकुळे यांनी आभार मानले. गुरुवारी 28 नोव्हेंबरला केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय घेणार आहे', असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
पत्रकार परिषदेतील इतरही काही महत्वाचे मुद्दे
- एकनाथ शिंदे आजही आणि यापुढेही महायुतीचे नेते असतील.
- केंद्रीय नेतृत्व आता योग्य निर्णय करेल.
- मोदी-शाह जो निर्णय घेतील तो राज्यातील महायुतीला मान्य असेल.
- निश्चितपणे योग्य नेतृत्व केंद्रीय नेते महाराष्ट्राला देतील.
- एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे खूप-खूप मनापासून आभार.
हेही वाचा -