ETV Bharat / bharat

मुस्लिम वृद्ध मारहाण प्रकरण : गाझियाबाद पोलिसांकडून ट्विटर इंडियाचे तक्रार अधिकारीसह पाच जणांना समन्स - ट्विटर इंडिया तक्रार अधिकारी पाच जणांना समन्स

गाझियाबाद पोलिसांनी 21 जूनला कर्नाटकाच्या बंगळुरु येथील ट्विटर इंडियाच्या एमडी यांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता लोनी बॉर्डर पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.

twitter india
ट्विटर इंडिया
author img

By

Published : Jul 4, 2021, 3:34 PM IST

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - लोणी बॉर्डर क्षेत्रातील एका मुस्लीम वृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांना 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देण्याची बळजबरी करत मारहाण केल्याचे पीडिताने म्हटलं आहे. यावरून राजकारण तापलं आहे. आता गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरचे तक्रार अधिकारी धर्मेंद्र चतुर यांच्यासह पाच जणांना पुन्हा समन्स बजावले आहे. जिल्ह्यातील एका वृद्ध व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित चौकशीच्या संदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहेत.

24 जूनपूर्वी पोलिसांसमोर हजर राहण्यास याआधी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांना सांगितले होते. मात्र, ते हजर राहिले नाहीत. यानंतर गाझियाबाद पोलिसांनी 21 जूनला कर्नाटकाच्या बंगळुरु येथील ट्विटर इंडियाच्या एमडी यांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता लोनी बॉर्डर पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.

यानंतर 15 जूनला पोलिसांनी ट्विटर, ट्विटर कम्युनिकेशन्स इंडिया, न्यूज वेबसाइट 'द वायर', पत्रकार मोहम्मद जुबैर आणि राणा अयूब यांच्यासह कॉंग्रेसचे नेते सलमान निजामी, मस्कूर उस्मानी, शमा मोहम्मद आणि लेखक सबा नकवी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर एका व्हिडिओच्या प्रचाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्हिडिओत एका वयोवृद्ध व्यक्तीने दावा केला की, काही तरुणांनी त्याला मारहाण केली आणि 5 जूनला जय श्री रामचा जयघोष करण्यास सांगितले. पोलिसांनी दावा केला आहे की, हा व्हिडिओ जातीय अशांततेला प्रेरित करु शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.