हैदराबाद - व्हेल माशाची उलटी म्हणजे अॅम्बेरग्रीसला बाजारात खूप किंमत असते. ८ किलोची सुमारे १२ कोटी रुपये किंमत असलेली व्हेलची उलटी आंध्र प्रदेश पोलिसांनी टोळीकडून जप्त केली आहे.
व्हेलची उलटी गुंटूर जिल्ह्यातील नरसरावपेठमध्ये विकण्याचा प्रयत्न टोळीकडून करण्यात येणार होता. ही माहिती कळताच वनाधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या व्हेलची उलटी १२ कोटी रुपये किंमत आहे. चेन्नई वन्यविभागाचे वन्यजीव संवर्धन गुन्हे नियंत्रणाचे अधिकारी अशा बेकायदेशीर व्यवसायावर लक्ष ठेवून असतात.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नरसरावरपेठगावातील पुवाडा रुग्णालयात टोळीला अटक केली आहे. आरोपींना नरसरावपेठ न्यायालयासमोर रविवारी हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना दोन आठवड्यांची कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा-मध्य प्रदेश : फोटोशुट करताना तीन मुले नदीत बुडाले; एकाला वाचविण्यात यश
माशाची उलटीला म्हणतात समुद्रात तरंगणारे सोने-
समुद्रात तरंगणारे सोने म्हणून ज्या वस्तूची ओळख आहे, ती म्हणजे व्हेल माशाची उलटी! या उलटीचा उपयोग औषध बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे उलटीला आंतरराष्टीय बाजारात करोडोंची किंमत आहे.
हेही वाचा-फादर स्टॅन स्वामी यांचे निधन, २० मिनिटांच्या चौकशीनंतर झाली होती अटक
उलटीचा वापर कशासाठी?
व्हेल माशाच्या उलटीचा वापर उच्चप्रतीचे परफ्यूम बनवण्यासाठी आणि औषधामध्ये होतो. ही उलटी फार दुर्मिळ असते. त्यामुळे तिची किंमत ही मोठी असते.