संभल (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्नॅपचॅटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एका तरुणाने संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीशी मैत्री केली. यानंतर संभल येथे पोहोचल्यानंतर तरुणाने तरुणीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध धर्मांतरासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
तरुणाने लपविली खरी ओळख : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी उशिरा बानियाथेर पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी मुलगी तिच्या मित्रासह विकासनगर येथील तिच्या काकाच्या घरी गेली होती. तरुणीसोबत एक तरुणही होता. तिने त्या तरुणाने नाव मनोज ठाकूर असे सांगून तो आपल्या मैत्रिणीचा भाऊ असल्याचे सांगितले. मुलीने तिच्या काकांना तरुणाला अभ्यासासाठी भाड्याने घर मागितले. मात्र तरुणाचे कृत्य पाहून मुलीच्या काकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी तरुणाची चौकशी केली.
हिंदू संघटनेने दिले पोलिसांच्या ताब्यात : चौकशीदरम्यान त्यांनी त्या तरुणाला त्याचे आधारकार्ड मागितले असता तो संकोचत होता. त्या तरुणाचे आधारकार्ड पाहताच त्याचे वास्तव समोर आले. आधार कार्डमध्ये तरुणाचे नाव सद्दाम रा. सोपारा पूर्व, महाराष्ट्र असे लिहिले होते. नाव बदलून येथे पोहोचलेल्या या तरुणावरून एकच गोंधळ उडाला. प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे लोकही घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीच्या बॅगेतून बुरखा सापडला : पोलिसांच्या चौकशीत तरुणाने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्याची स्नॅपचॅटच्या माध्यमातून या तरुणीशी ओळख झाली होती. तो तिला आपली बहीण मानून तिला भेटायला आला होता. त्याचवेळी आरोपीच्या बॅगेतून बुरखाही सापडला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीश चंद्र यांनी सांगितले की, चंदौसी कोतवाली भागातील एका मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. आपले नाव आणि खरी ओळख लपवून महाराष्ट्रातील एका तरुणाने तरुणीशी गप्पा मारून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
लव्ह जिहाद प्रकरणी ठाण्याच्या तरुणाची विचारपूस : उत्तर प्रदेशात लव जिहाद प्रमाणेच मोबाईल गेमच्या बहाणे मुलांचे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गाझीयाबाद येथे एका तरुणाला अटक केली. त्याची चौकशी केली असता ठाण्याच्या मुब्रां शहरातील शाहनवाज मकसूदचं नाव समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी मकसूदच्या शेजाऱ्यांची विचारपूस केली असता त्यांनी याची काहीच माहिती नसल्याचे म्हटले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मकसूद त्याची आई व दोन भावंडांसह राहत असे. ते तिन्ही मुले चांगली होती. त्यांच्या घरी आत्तापर्यंत कधीच पोलीस आले नव्हते.
हेही वाचा :